Saare Jahan Se Accha: ऑगस्ट महिन्यात नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन चित्रपट व सीरिज रिलीज झाल्या. दुसऱ्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर आलेल्या एका सीरिजचा सध्या जलवा पाहायला मिळतोय. या सीरिजने पहिल्याच आठवड्यात ओटीटीवर टॉप १० ट्रेंडिंग कलाकृतींच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
प्रतीक गांधी आणि सनी हिंदुजा यांची ‘सारे जहाँ से अच्छा’ ही सीरिज १३ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. या सीरिजला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या थ्रिलर सीरिजने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात नेटफ्लिक्सच्या टॉप १० ट्रेंडिंग शोच्या यादीत स्थान मिळवलं आहे. इतकंच नाही तर ती टॉप ५ मध्येही आली आहे. ‘सारे जहाँ से अच्छा’ ही सीरिज नेटफ्लिक्सवरील सर्वात यशस्वी हिंदी सीरिज ठरली आहे.
सीरिजला किती व्ह्यूज मिळाले?
११ ते १७ ऑगस्ट या आठवड्यातील नेटफ्लिक्सच्या व्ह्यूवरशीप डेटानुसार, ‘सारे जहाँ से अच्छा’ ही नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक पाहिली गेलेली पावची सीरिज ठरली आहे. पहिल्या आठवड्यात, या सीरिजला २.३ मिलियन व्ह्यूज मिळाले, म्हणजेच ९.५ मिलियन तास ही सीरिज पाहिली गेली. पहिल्या आठवड्यातच सुरुवात इतकी दमदार झाली, त्यामुळे येत्या आठवड्यात हा शो व्ह्यूजच्या बाबतीत आणखी विक्रम मोडेल अशी शक्यता आहे.
‘सारे जहाँ से अच्छा’ ही सीरिज १९६६ मध्ये झालेल्या विमान अपघातात भारतीय शास्त्रज्ञ होमी भाभा यांच्या मृत्यूपासून सुरू होते. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर दोन गुप्तहेर संस्थांच्या उदयाची कथा यात दाखवण्यता आली आहे. प्रतीकने या सीरिजमध्ये विष्णू या भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. तर सनी हिंदुजाने मुर्तझाचे पात्र साकारले आहे.
पाहा ट्रेलर
सुमित पुरोहित दिग्दर्शित या स्पाय थ्रिलर सीरिजमध्ये जवळपास ४० मिनिटांचे सहा भाग आहेत. ‘सारे जहाँ से अच्छा’ या सीरिजमध्ये प्रतीक गांधी, सनी हिंदुजा, सुहेल नय्यर, तिलोत्तमा शोम, अनुप सोनी आणि इतर अनके कलाकार आहेत. सेजल शाह आणि भावेश मंडालिया यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. या सीरिजला पहिल्या आठवड्यात खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तुम्हाला देशभक्तीपर चित्रपट, सीरिज पाहायला आवडत असतील तर नेटफ्लिक्सवर ही सीरिज तुम्ही पाहू शकता.