ओटीटीवर सध्या अनेक रंजक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. कमी बजेटचे जे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नाहीत, ते ओटीटीवर ट्रेंड करत आहेत. असाच एक चित्रपट प्राइम व्हिडीओवर ट्रेंडिंग आहे. या चित्रपटात सुरुवातीला साधा भोळा वाटणारा हिरो त्याच्या गर्लफ्रेंडसाठी ज्या धक्कादायक गोष्टी करतो, ते पाहून तुम्ही चक्रावून जाल. या सिनेमाचा क्लायमॅक्सही दमदार आहे.

आज आम्ही तुम्हाला एका अशा क्राइम कॉमेडी चित्रपटाबद्दल सांगतोय जो ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत एक दाक्षिणात्य अभिनेता आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला होता, पण ओटीटीवर मात्र तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

या क्राइम कॉमेडी चित्रपटाला आयएमडीबीवर ७ रेटिंग मिळाले आहे. या चित्रपटाचे नाव ‘एस’ (Ace) असे आहे. यात विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहे. २३ मे रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला, पण तो बजेटही वसूल करू शकला नाही. निर्मात्यांनी Ace च्या निर्मितीसाठी २० कोटी रुपये खर्च केले होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १० कोटी रुपये कमावले. हा चित्रपट एका आठवड्यापूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर रिलीज झाला.

पाहा ट्रेलर-

ओटीटीवर रिलीज होताच विजय सेतुपतीच्या Ace ने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर दुसऱ्या नंबरवर ट्रेंड करत आहे. पहिल्या क्रमांकावर इमरान हाश्मीचा चित्रपट आहे. ‘ग्राउंड झीरो’ सध्या प्राइम व्हिडीओवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करतोय. ‘ग्राउंड झीरो’देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता, पण तोही ओटीटीवर प्रेक्षकांची मनं जिंकतोय.

Ace मध्ये विजय सेतुपतीबरोबर योगी बाबू, रुक्मिणी वसंत व कल्पना पिल्लई या कलाकारांनी काम केलं आहे. या चित्रपटात विजयने बोल्ट कन्नन नावाचे पात्र साकारले आहे. या सिनेमात रुक्मिणीच्या पात्राचे नाव रुक्मिणी असेच आहे. चित्रपटात बोल्ट कन्ननचे पात्र सस्पेन्समध्ये ठेवले आहे. तर, योगी बाबूने अरिवू नावाचे पात्र केले आहे. बोल्ट अरिवूला मलेशियाच्या एका एअरपोर्टवर भेटतो. अरिवू बोल्टला एका हॉटेलमध्ये काम मिळवून देतो. नंतर त्याची रुक्मिणीशी भेट होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुक्मिणीचे वडील सावत्र असतात. ते पोलीस अधिकारी असतात. ते एका मुलीचं शोषण करतात. रुक्मिणीला तिच्या वडिलांचं घर खाली करण्यासाठी कोट्यवधी रुपये हवे असतात. बोल्ट कन्नन याबद्दल कळताच तो एका बँकेत दरोडा टाकण्याचा कट रचतो. त्यासाठी तो एका गुंडाकडून पैसे उसने घेतो. पण शेवटी मात्र असा गोंधळ होतो की बोल्ट अडकतो. त्यानंतर तो दुसरा कट रचतो आणि रुक्मिणीच्या सावत्र वडिलांचा खून करतो.