आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाणारी राधिका आपटे १७ वर्षांपेक्षा जास्त काळ या इंडस्ट्रीत कार्यरत आहे. राधिका आपटेने कोणत्याही गॉडफादरशिवाय आपल्या कौशल्याच्या जोरावर या इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिने खूप संघर्ष केला. याबरोबरच ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे राधिका आपटेला वेगळी ओळख मिळाली.

नुकतंच तिने तिच्या आगामी चित्रपटाबाबत घोषणा केली आहे. राधिकाने तिच्या आगामी ‘मिसेस अंडरकव्हर’ या चित्रपटाचा टीझर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या टीझरमध्ये राधिका दिवसा एक गृहिणी आणि रात्री भूमीगत गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसत आहे. ‘मोनिका ओ माय डार्लिंग’मध्ये दमदार अभिनय केल्यानंतर राधिका या चित्रपटात अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारणार आहे.

आणखी वाचा : ‘बजरंगी भाईजान’च्या सीक्वलची चर्चा; सलमानबरोबर करीना नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री दिसू शकते मुख्य भूमिकेत

टीझर पाहून याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. राधिकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. टीझर पाहून चाहत्यांना हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरेल अशी आशा आहे. राधिकाच्या या पोस्टवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, “राधिका तुझा लूक उत्तम आहेच पण यावेळी तो अधिक आकर्षक वाटतो आहे.” तर दुसर्‍याने लिहिले, “मला वाटते की हा चित्रपट प्रचंड मजेदार असेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून हा टीझर शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, आहे ‘होम मेकर ऑर बोन ब्रेकर?’. टीझरच्या शेवटी दिसणारा राधिकाचा डॅशिंग लूक पूर्णपणे दाखवलेला नसल्याने चाहत्यांना तिला या अवतारात पाहायची उत्सुकता लागली आहे. अनुश्री मेहता हिने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सुमित व्यास आणि राजेश शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.