बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व संपण्यासाठी अवघे काही आठवडे बाकी आहे. त्यामुळे सध्या बिग बॉस ओटीटीमधील स्पर्धेकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. दरम्यान, मागील विकेंडच्या वारला सलमान खानने स्पर्धक एल्विश यादवला चांगलंच खडसावलं होतं. घरातील एका महिला स्पर्धकाविषयी त्यानं केलेल्या भाष्याबद्दल आणि फॉलोवर्सबद्दल सुनावलं होतं. पण त्यानंतर सलमान खानच्या सोशल मीडियावरील फॉलोवर्सममध्ये घसरण झाल्याचा दावा करण्यात आला. यावरून अजूनही चर्चा रंगली आहे. यावर आता कॉन्ट्रोवर्शियल क्वीन राखी सावंतनं प्रतिक्रिया दिली आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर राखी सावंतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये राखी सलमान खानच्या फॉलोवर्समध्ये झालेली घसरण पाहून भडकल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत राखी म्हणतेय की, “सर्वसामान्य लोक जे एल्विश यादवला पाठिंबा देतायत त्याच्यासाठी तुम्हाला सेल्युट आहे. परंतु सलमान खानच्या फॉलोवर्समध्ये घसरण होतेय, त्यांना तर मी सोडणारच नाही. सलमान खान जिंदाबाद. जब तक सूरज चांद रहेगा. सलमान खान आपका और आपके फॉलोवर्स का नाम रहेगा. ये मी हॉलीवूड स्टार आहे, गाडीचा दरवाजा बंद कर.”

हेही वाचा – Video: “…तेव्हा माझा अहंकार दुखावला” पल्लवी जोशींनी बालपणीच्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाल्या…

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम मंदार जाधवने दुसऱ्याच्या लग्नात उरकला होता स्वतःचा साखरपुडा; खुलासा करत म्हणाला…

राखीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “राखी सावंत अगदी बरोबर बोलली. सलमान खानचे फॉलोवर्स कमी झाल्यानं काहीही होत नाही.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “सलमान हा सर्वांचा बाप आहे.” तसेच जॅकलीन नावाच्या फॅन पेजनं लिहिलं आहे की, “सलमान खानचे फॉलोवर्स ६६ मिलियन नव्हतेच. एल्विशचे पागल फॅन चुकीचे एडिटिंग करून दाखवत आहे.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबबरोबर अफेअरच्या चर्चा, निमिषने सोडलं मौन; म्हणाला, “आम्ही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बिग बॉस ओटीटीमध्ये या आठवड्यात जिया शंकर, मनिषा रानी, जैद हदीद आणि अविनाश सचदेव नॉमिनेट आहेत. त्यामुळे आता येत्या रविवारी या चौघांमधून शोच्या बाहेर कोण होतं? हे स्पष्ट होईल.