अभिनेत्री राखी सावंत पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानी याने दुसरं लग्न केलं आहे. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकल्याची माहिती दिली. त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याची पत्नी ही अभिनेत्री आहे. या जोडप्याने जयपूरमध्ये निकाह केला.

आदिल खानने ‘बिग बॉस १२’ फेम सोमी खानशी ३ मार्च रोजी निकाह केला आहे. आमचा निकाह एका साध्या आणि सुंदर समारंभात पार पडला हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. पती-पत्नी या नात्याने आमचा नवा प्रवास सुरू करण्यास आम्ही उत्सुक आहोत. सुखी वैवाहिक जीवनासाठी कृपया आमच्यासाठी पार्थना करा, असं कॅप्शन आदिल खानने शेअर केलेल्या या फोटोंना दिलं आहे.

कोण आहे सोमी खान?

सोमी मूळची राजस्थानमधील जयपूर इथली रहिवासी आहे, आता कामानिमित्त ती मुंबईत राहते. सोमीने ‘न्याय’, ‘केसरिया बालम’ आणि ‘हमारा हिंदुस्तान’ यांसारख्या अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे. ‘बिग बॉस १२’ मध्ये सोमी खान तिची बहीण सबा खानसह सहभागी झाली होती. त्या सीझनमध्ये दीपिका कक्कर सलमान खानच्या रिॲलिटी शोची विजेती ठरली होती. सोमीने आता आदिल खान दुर्रानीशी लग्न केलं आहे.

“१३ वर्षांनी घरी…!” प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमन बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, पाकिस्तानी गाण्यावरील एंट्रीने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखी सावंतमुळे चर्चेत राहिला आदिल खान

राखी सावंतमुळे आदिल खान दुर्रानी मागच्या दोन वर्षांपासून चर्चेत आहे. आधी राखी व आदिल एकमेकांसह डेट करत होते, नंतर त्यांनी इस्लाम पद्धतीने लग्न केलं होतं. लग्नाची माहिती त्यांनी काही महिने लपवून ठेवली होती. सहा महिन्यांनी त्यांनी लग्नाची घोषणा केली आणि नंतर त्या दोघांमध्ये वाद होऊ लागले. त्यानंतर राखीने आदिलवर गंभीर आरोप केले आणि त्याला अटक झाली. त्यावेळी राखीने आदिलपासून घटस्फोट झाल्याचं म्हटलं होतं. हे दोघेही लग्नानंतर वर्षभरात म्हणजेच २०२३ मध्ये विभक्त झाले होते.