अभिनेता शाहिद कपूरचा बहुचर्चित अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘ब्लडी डॅडी’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात शाहिद जबरदस्त अ‍ॅक्शन करताना पाहायला मिळणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात संजय कपूर, डायना पेंटी, रोनित रॉय आणि राजीव खंडेलवाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हेही वाचा : बॉलीवूडचा कोणता सेलिब्रिटी रणबीरच्या लेकीला चांगलं सांभाळेल? अभिनेता म्हणाला, “हा सुपरस्टार राहासाठी परफेक्ट…”

शाहिदचा हा चित्रपट ओटीटी माध्यमावर ९ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. जिओ सिनेमा या ओटीटी अ‍ॅपवर तुम्ही हा चित्रपट विनामूल्य पाहू शकता. शाहिदने ‘ब्लडी डॅडी’चा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये, “वन हेल ऑफ ब्लडी नाईट…” असे लिहिले आहे. ‘ब्लडी डॅडी’च्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूर दमदार अ‍ॅक्शन आणि फायरिंग करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांना रोमॅंटिक हिरो, चॉकलेट बॉय याव्यतिरिक्त शाहिदचा एक वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : “तू खोटारडी आहेस…” सान्या मल्होत्राने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “शाहरुखबरोबर जवानमध्ये…”

ज्योती देशपांडे निर्मित ‘ब्लडी डॅडी’ चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. ट्रेलर रिलीज करण्यापूर्वी शाहिद कपूरने चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले होते. हे पोस्टर पाहून त्याच्या चाहत्यांना हा चित्रपट अ‍ॅक्शनने परिपूर्ण असेल याची कल्पना आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ब्लडी डॅडी’चा ट्रेलर शेअर केल्यावर शाहिदच्या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करीत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. शाहिद कपूरने यापूर्वी राज आणि डीके यांची क्राईम थ्रिलर वेब सीरिज ‘फर्जी’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. ‘ब्लडी डॅडी’नंतर शाहिद लवकरच अभिनेत्री क्रिती सेनॉनबरोबर एका रोमॅंटिक चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही.