scorecardresearch

ओटीटी विश्वात शाहिद कपूरच्या ‘फर्जी’ने रचला इतिहास; लोकप्रिय वेबसीरिजना मागे टाकत मोडला ‘हा’ रेकॉर्ड

‘फर्जी’च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे

farzi webseries record
फोटो : सोशल मिडिया

‘फॅमिली मॅन’सारखी जबरदस्त हीट वेबसीरिज देणारे दिग्दर्शक राज आणि डीके यांची ‘फर्जी’ ही नवी वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. यामध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहे. या वेबसीरिजचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाहिद आणि विजय सेतुपती यांच्या अभिनयाची प्रशंसा केली जात आहे. खोट्या चलनी नोटा बनवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटबद्दल आणि एकूणच या गुन्ह्याबद्दल या वेबसीरिजमध्ये फार उत्तमरित्या भाष्य केलं गेलं आहे.

शिवाय या सीरिजचे निर्माते राज आणि डीके यांच्या ‘द फॅमिलीमॅन’ या वेबसीरिजशी याचं कनेक्शन जोडल्याने चाहते याच्या पुढच्या सीझनसाठी आणखीनच उत्सुक आहेत. ‘फर्जी’च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. इतकंच नव्हे तर ओटीटी विश्वात एक वेगळाच विक्रम या वेबसीरिजने रचला आहे.

आणखी वाचा : वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘भीड’ बॉक्स ऑफिसवर ठरला अयशस्वी; दुसऱ्या दिवशी केली एवढी कमाई

यातील मुख्य अभिनेता शाहिद कपूरने नुकतंच त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली आहे. ही खुशखबर म्हणजे ‘फर्जी’ ही भारतात सर्वात जास्त पहिली गेलेली वेबसीरिज ठरली आहे. याच बातमीचा स्क्रीनशॉट शाहिद कपूरने शेअर करत त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘ऑर्मैक्स इंडिया’च्या या रोपोर्टनुसार या वेबसीरिजने इतरही काही लोकप्रिय वेबसीरिजना मागे टाकलं आहे.

शाहिदची ही वेबसीरिज सर्वाधिक पहिली जाणारी ठरली असून, ‘मिर्झापूर’ आणि ‘द फॅमिली मॅन’सारख्या लोकप्रिय वेबसीरिजना ‘फर्जी’ने मागे टाकलं आहे. या वेबसीरिजमध्ये शाहिद कपूर, केके मेनन, विजय सेतुपती, राशी खन्ना, अमोल पालेकर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता याच्या पुढच्या सीझनची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत. शाहिद कपूरने याबद्दल मध्यंतरी भाष्य केलं, याचा दूसरा सीझन यायला बराच वेळ आहे पण पुढील सीझन येणार हे नक्की असल्याचं शाहिदने स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 10:42 IST

संबंधित बातम्या