तुम्ही ‘दृश्यम’ पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल की खून झाल्यानंतरही पोलिसांना खून कोणी केला हे कळत नाही. खून करणारा अशा पद्धतीने सगळी कथा रचतो की तीच सर्वजण चक्रावतात. दुसरीकडे, २०२४ मध्ये आलेल्या महाराजा चित्रपटातही दमदार सस्पेन्स पाहायला मिळाला होता. हे दोन्ही ओटीटीवरील जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहेत. एका चित्रपटात तुम्हाला हत्येची कथा पाहायला मिळते, तर दुसऱ्या चित्रपटात तुम्हाला खून करणाऱ्याच्या शोधाची गोष्ट पाहायला मिळते. चित्रपट मर्डर मिस्ट्रीवर बेतलेले असले तरी दोन्हीच्या कथा उत्तम आणि एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या आहेत.

तुम्हालाही ‘दृश्यम’, ‘महाराजा’सारखे असे सस्पेन्सने भरलेले चित्रपट पाहायला आवडत असतील तर ओटीटीवर तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सस्पेन्स थ्रिलर चित्रपट म्हटलं की त्यात मोठ्या प्रमाणात दाक्षिणात्य चित्रपट असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच तीन दमदार दाक्षिणात्य सिनेमांबद्दल सांगणार आहोत. या चित्रपटांच्या कथा, त्यातील ट्विस्ट अन् क्लायमॅक्स पाहून तुम्ही स्तब्ध व्हाल.

इराट्टा (Iratta)

Iratta on Netflix: हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.७ रेटिंग मिळाले आहे. Iratta सिनेमात एका पोलिसाचा खून होतो. त्यानंतर फ्लॅशबॅग, वर्तमान काळातील घटना व इतर काही अँगल पाहायला मिळतात. यातील दमदार ट्विस्टबरोबरच भारदस्त संवाद आहेत. एकाच लोकेशनवरील या चित्रपटात भावुक करणारे ट्विस्ट येतात. हा चित्रपट पाहून तुम्हाला महाराजा सिनेमाची आठवण होईल.

कुरंगू बोम्मई (Kurangu Bommai)

Kurangu Bommai on Prime Video : प्राइम व्हिडीओवरील कुरंगू बोम्मई या चित्रपटाचे दिग्दर्शन नितिलन सामीनाथनने केले आहे. ७.९ आयएमडीबी रेटिंग असलेला हा चित्रपट एका बॅगच्या अवतीभोवती फिरतो. फ्लॅशबॅक व वर्तमानात घडणाऱ्या घटनांचा उत्तम मिलाफ या सिनेमात पाहायला मिळतो. शेवटी यात जबरदस्त ट्विस्ट असलेला क्लायमॅक्स आहे. बाप-लेकाचं नातं आणि गुन्हेगारी विश्व याची सांगड या चित्रपटात घालण्यात आली आहे.

Ela Veezha Poonchira

Ela Veezha Poonchira on Prime Video : शाही कबीर दिग्दर्शित Ela Veezha Poonchira या मल्याळम चित्रपटाची खासियत त्याचे लोकेशन, हळूहळू उलगडत जाणारी कथा आणि क्लायमॅक्समधील धमाकेदार ट्विस्ट आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.३ रेटिंग मिळाले आहे.