OTT Releases Of the Week : ओटीटीवर एकापेक्षा एक असे चित्रपट, वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. हॉरर, क्राइम, थ्रिलर, ड्रामा, फॅमिली शो अशा विविध कलाकृती ओटीटीवर पाहता येतात. मुख्यत: क्राईम, थ्रिलर, हॉरर या विषयांवर आधारित चित्रपट, वेब सीरिजना ओटीटीवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. अशातच जुलै महिन्याचा पहिला आठवडा ओटीटी प्रेक्षकांसाठी खूपच चांगला गेला.

पहिल्या आठवड्यात ‘हेड्स ऑफ स्टेट’, ‘ठग लाइफ’, ‘कालीधर लापता’, ‘गुड वाइफ’ असे काही चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित झाल्या. आता जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आपल्याला काय नवीन पाहता येणार आहे तेजाणून घेऊ या.

मूनवॉक : हा एक मल्याळम चित्रपट असून, या आठवड्यात तो ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ८ जुलैपासून हा चित्रपट पाहता येणार आहे. ‘मूनवॉक’ या वर्षी मे महिन्यामध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. विनोद ए. के. यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट तारुण्यावस्थेतील मित्रांच्या आयुष्यावर आधारित आहे. ‘जिओ हॉटस्टार’वर तो पाहता येईल.

झियाम : हा चित्रपट झोंबी अॅक्शन फिल्म आहे. लवकरच तो ‘नेटफ्लिक्स’वर पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. ९ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, त्यामध्ये मार्क प्रिन सुपारत मुख्य भूमिकेत आहे.

बॅलार्ड : ही एक हॉलीवूड सीरिज आहे. ९ जुलैपासून ‘प्राइम व्हिडीओ’वर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज एलएपीडी (LAPD) डिटेक्टिव्ह रेनी बॅलार्डभोवती फिरते, ज्याची भूमिका मॅगी क्यूने साकारली आहे.

आप जैसा कोई : हा या आठवड्यात प्रदर्शित होणारा एक खास चित्रपट आहे. त्यामध्ये अभिनेता आर. माधवन व अभिनेत्री फातिमा सना शेख असे दोघे झळकणार आहेत. त्यामध्ये या दोघांमधील रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. ११ जुलैला हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होऊ शकतो.

स्पेशल ऑप्स २ : या गाजलेल्या सीरिजचा हा दुसरा भाग आहे. ‘स्पेशल ऑप्स २’ या आठवड्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. ११ जुलैपासून ‘जिओ हॉटस्टार’वर ही सीरिज पाहता येईल. ही सीरिज २०२५ मधील बहुचर्चित सीरिज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नारिवेट्टा : हा एक मल्याळम सिनेमा आहे. दक्षिणात्य अभिनेता टोविनो थॉमसचा हा चित्रपट ११ जुलैपासून ‘सोनी लिव्हवर’ पाहण्यासाठी उपलब्ध होईल.