अलीकडच्या काळात बरेच मराठी कलाकार हिंदी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रिया बापट, सई ताम्हणकर, सुव्रत जोशी, महेश मांजरेकर, प्रथमेश परब या कलाकारांपाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीने लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्याबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.

आपला सहज सुंदर अभिनय व कविता यांच्या जोरावर घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री स्पृहा जोशी नुकतीच हिंदी कलाविश्वातील एका वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये स्पृहाने आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता स्पृहाने नेमक्या कोणत्या सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारलीये हे जाणून घेऊयात…

हेही वाचा : ‘कन्यादान’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! समोर आला पहिला फोटो, लग्नाला मराठी कलाकारांची मांदियाळी

स्पृहा जोशीने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रणनीती’ या सीरिजमध्ये लहानशी पण लक्षवेधी भूमिका साकारली आहे. यासंदर्भात अभिनेत्रीने स्वत: पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. अभिनेत्री लिहिते, “‘रणनीती’ सीरिजमध्ये साकारलेल्या लहानशा भूमिकेसाठी गेल्या काही दिवसांत जे काही कौतुक करण्यात आलं त्यासाठी मी सदैव ऋणी आहे. माझ्या भूमिकेवर भरभरून प्रेम केल्याबद्दल धन्यवाद! ‘रणनीती’ सीरिजमध्ये मी लहानशी भूमिका साकारली आहे. ही सीरिज तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता.”

हेही वाचा : Video : दिग्दर्शकाने ‘चिंटू’ हाक मारताच ऋषी कपूर झालेले नाराज, भर कार्यक्रमात म्हणाले होते, “माझ्या मुलांना कधीच…”

“जिमी शेरगिलसारख्या आवडत्या कलाकाराबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यावर आणि काय हवं? जिमी तुझ्याबरोबर पुन्हा एकदा काम करताना खूप मजा आली. सेटवरचा प्रत्येक क्षण काहीतरी शिकवणारा आणि वेगळा अनुभव देणारा ठरला. एवढ्या चांगल्या टीमचा मला एक भाग होता आलं यासाठी मी प्रचंड आनंदी आहे. या सीरिजचा एकही एपिसोड चुकवू नका नक्की पाहा” अशी पोस्ट शेअर करत स्पृहाने तिच्या कामाबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे.

हेही वाचा : Video : घुमा नाचते हो…! ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’जवळ मुक्ता बर्वेचा मराठमोळा अंदाज, केला जबरदस्त डान्स

View this post on Instagram

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिमी शेलगिल आणि लारा दत्ता यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘रणनीती’ सीरिज बालाकोट एअरस्ट्राइकवर भाष्य करते. या सीरिजच्या निमित्ताने प्रेक्षकांना एअरस्ट्राइक संदर्भात आणखी माहिती मिळेल दरम्यान, सध्या मराठी कलाविश्वातून मला कौतुकाचे मेसेज येत आहे. फुलवा खामकर, अश्विनी कासार आणि खुद्द जिमीने पोस्टवर कमेंट करत स्पृहाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.