सध्या ओटीटी विश्वात ‘जिओ सिनेमा’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म धुमाकूळ घालत आहे. वेगवेगळे चित्रपट वेब सीरिज, तसेच हॉलिवूडचे चित्रपट आणि सीरिज या प्लॅटफॉर्मवर हळूहळू प्रदर्शित व्हायला सुरुवात झाली आहे. ‘विक्रम वेधा’ आणि ‘भेडीया’सारखे चित्रपटही तब्बल ६ महिन्यांनी या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. आता यात आणखी एका बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाची भर पडली आहे.

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘मी वसंतराव’ हा चित्रपट गेल्या वर्षी १ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. ठीकठिकाणी याचे शोज हाऊसफूल होत होते. बराच काळ हा चित्रपट चित्रपटगृहात ठाण मांडून बसला होता, पण त्यानंतर मात्र या चित्रपटाची ओटीटी प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं.

आणखी वाचा : बॉलिवूड अभिनेत्रींच्या म्हातारपणीचे AI ने तयार केलेले फोटो व्हायरल; दीपिका पदूकोणला पाहून घाबरले नेटकरी

मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म हा चित्रपट का घेत नाहीत असा प्रश्न निपुण धर्माधिकारीने केला होता. आता मात्र तसा प्रश्न पुन्हा विचारायची गरज भासणार नाहीये. तब्बल वर्षभरानंतर ‘मी वसंतराव’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. येत्या २१ मेपासून हा चित्रपट ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना मोफत बघता येणार आहे. यासाठी कोणतेही ज्यादा शुल्क द्यावे लागणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. खुद्द निपुण धर्माधिकारी यानेच ही पोस्ट शेअर करत ही बातमी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
nipun-dharmadhikari-post
फोटो : सोशल मीडिया

‘मी वसंतराव’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंच शिवाय या चित्रपटाला भरपूर पुरस्कारही मिळाले. दिग्गज शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला होता. यात त्यांचा नातू राहुल देशपांडे यांनी मुख्य भूमिका निभावली होती. एक सुरेल मैफिलीचा अनुभव देणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना आता ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.