Suspense Thriller Movies on Netflix : तुम्हाला सस्पेन्स थ्रिलर चित्रपट पाहायला आवडत असतील तर नेटफ्लिक्सवरील काही चित्रपट नक्की पाहायला हवे. यातील सस्पेन्स पाहून तुमचं डोकं चक्रावेल. या वीकेंडला ओटीटीवर काय पाहावं, असा विचार करत असाल तर यातील काही सिनेमे नक्की पाहा. वाचा नेटफ्लिक्सवरील टॉप १० सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांची यादी.
द बकिंघम मर्डर्स
हंसल मेहता दिग्दर्शित या चित्रपटात करीना कपूर खानची मुख्य भूमिका आहे. यात करीना एका १० वर्षांच्या मुलाच्या हत्येचा गूढ उकलण्याचा प्रयत्न करते. शेवटी जे सत्य समोर येतं, ते पाहून तुमचं डोकं चक्रावेल.
जाने जां
सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटात करीना कपूर, जयदीप अहलावत व विजय वर्मा हे कलाकार आहेत. या चित्रपटातील सस्पेन्स तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
द युज्अल सस्पेक्ट्स
1995 साली आलेला हा हॉलीवूड क्लासिक थ्रिलर चित्रपट चुकवू नका. यातील शॉकिंग क्लायमॅक्स समजायला कदाचित तुम्हाला दुसऱ्यांदा चित्रपट पाहावा लागेल. या चित्रपटाचा लेखक व अभिनेत्याला ऑस्कर पुरस्कार देण्यात आला होता.
खुफिया
विशाल भारद्वाज दिग्दर्शित या सिनेमाची कथा इरफान खानसाठी लिहिण्यात आली होती. इरफानच्या निधनानंतर कथेत बदल करून तब्बूला मुख्य भूमिकेत घेण्यात आलं होतं. रॉ एजंट व देशभक्तीपर हा चित्रपट एकदा तरी नक्की पाहायला हवा.
कॅलिबर (Calibre)
या अंडररेटेड ब्रिटिश थ्रिलर सिनेमात मैत्री, गुन्हेगारी या गोष्टी पाहायला मिळतात. दोन मित्रांकडून एक चूक होते, ज्यामुळे त्यांचं आयुष्य बदलतं.
1922
स्टीफन किंगच्या कथेवर आधारित या चित्रपटातील शॉकिंग सस्पेन्स पाहून तुम्ही थक्क व्हाल. यात एक पती पत्नीला मारायचा कट रचतो, पण नंतर भीती व पश्चातापामुळे जे घडलं ते पाहून तुम्ही चक्रावून जाल.
मोनिका ओ माय डार्लिंग
राजकुमार राव, हुमा कुरेशी व राधिका आप्टेचा हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट चुकवू नका. या ब्लॅख कॉमेडीत ऑफिस ड्रामा, मर्डर मिस्ट्रीदेखील आहे.
मर्डर मिस्ट्री
अॅडम सँडलर व जेनिफर अॅनिस्टन स्टारर या मर्डर मिस्ट्रीत सस्पेन्स व ह्युमर दोन्ही आहे. तुम्हाला मिस्ट्री थ्रिलर व कॉमेडी पाहायची असेल तर हा चित्रपट नक्की पाहा.
तलवार
आरुषी तलवार हत्याकांडने देशभरात खळबळ उडाली होती. मेघना गुलजारचा ‘तलवार’ चित्रपट त्या घटनेवर आधारित आहे. यात इरफान खानची मुख्य भूमिका आहे. यातील सस्पेन्स पाहून तुमचं डोकं चक्रावेल.
गॉन गर्ल
हा हॉलीवूड मिस्ट्री थ्रिलर चित्रपट नक्की पाहा. डेविड फिंचरचा हा चित्रपट एका अशा महिलेची कथा आहे जी बेपत्ता होते आणि संशय तिच्या पतीवर येतो. पण जेव्हा सत्य समोर येतं, ते पाहून तुम्ही हादरून जाल. सगळे चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहेत.