JioHotstar Thriller Movie: रहस्य, थरार आणि भावनांचा उत्तम संगम असलेला हा एक सुपरहिट मल्याळम चित्रपट आहे. प्रिया नावाच्या एका साध्या गृहिणीच्या आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटनांभोवती हा चित्रपट फिरतो. क्लायमॅक्सपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा चित्रपट दृश्यमची आठवण करून देतो. ‘सूक्ष्मदर्शिनी’ असं या सिनेमाचं नाव आहे.
साउथ इंडस्ट्री आपल्या वेगळ्या आणि प्रभावी कथानकासाठी कायम ओळखली जाते. त्यांचे रोमँटिक, अॅक्शन, सस्पेन्स-थ्रिलर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतात. जर तुम्हीही घरबसल्या एखादा थरारक चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर हा चित्रपट नक्की पाहा. या चित्रपटातील सस्पेन्स व क्लायमॅक्स इतका दमदार आहे की तुम्ही थक्क व्हाल.
‘सूक्ष्मदर्शिनी’तील कलाकार
या चित्रपटाचं नाव आहे ‘सूक्ष्मदर्शिनी’. हा नोव्हेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला २ तास २३ मिनिटांचा मल्याळम मिस्ट्री थ्रिलर सिनेमा आहे. सूक्ष्मदर्शिनीचे दिग्दर्शन एम.सी. जितिन यांनी केलं आहे. बासिल जोसेफ, नजरिया नजीम आणि अपर्णा राम यांनी यात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रमोशन न करताही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बजेटपेक्षा जवळपास चारपट जास्त कमाई केली आहे.
‘सूक्ष्मदर्शिनी’ सिनेमाची कथा काय आहे?
‘सूक्ष्मदर्शिनी’ या सिनेमाची कथा प्रिया नावाच्या एका गृहिणीभोवती फिरते. ती आपल्या पती व मुलासोबत आनंदाने आयुष्य जगत असते. मात्र त्यांच्या कॉलनीत मॅन्युअल आणि त्याची आई ग्रेस राहायला येतात आणि त्यानंतर प्रियाच्या आयुष्यात अनपेक्षित वळणं येऊ लागतात आणि हळुहळू सगळं बदलू लागतं. सिनेमात इंटरव्हलनंतर कथानक पूर्णपणे बदलतं आणि क्लायमॅक्समध्ये उलगडणारं गुपित पाहून प्रेक्षक चक्रावून जातात.
कोणत्या ओटीटीवर पाहायचा सूक्ष्मदर्शिनी?
Sookshmadarshini on JioHotstar : ‘सूक्ष्मदर्शिनी’ हा चित्रपट तुम्ही घर बसल्या जिओ हॉटस्टारवर पाहू शकता. IMDb वर या चित्रपटाला ७.८ रेटिंग मिळाले आहे.