Real Life Based Movies to watch on OTT: तुम्ही आतापर्यंत रोमँटिक, कॉमेडी, हॉरर असे अनेक चित्रपट ओटीटीवर पाहिले असतील. पण ओटीटीवर काही सत्य घटनांवर आधारित चित्रपटही उपलब्ध आहेत. या चित्रपटातील थ्रिलर, अॅक्शन व सस्पेन्स पाहून तुम्हाला धक्का बसेल. काही चित्रपटांचे क्लायमॅक्स तर असे आहेत की तुमचं डोकं चक्रावेल. अशाच सात चित्रपटांची नावं जाणून घेऊयात.

द डिप्लोमॅट

या सिनेमात जॉन अब्राहम भारतीय परराष्ट्र अधिकारी जे.पी. सिंह यांच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट २०१७ मध्ये दुसऱ्या देशात अडकलेल्या उज्मा अहमद नावाच्या भारतीय महिलेची सुटका करण्यावर आधारित आहेत. उज्मा अहमद ही भारताची रहिवासी असते, जी लग्नानंतर पाकिस्तानमध्ये अडकते. संपूर्ण चित्रपट एका मिशनभोवती फिरतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवम नायर यांनी केले आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमसह सादिया खातीब मुख्य भूमिकेत आहे. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर सहज पाहू शकता.

कोस्टाओ

बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचा चित्रपट ‘कोस्टाओ’ १ मे २०२५ रोजी ‘झी 5’ वर रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रिया बापटचीही मुख्य भूमिका आहे. यात नवाजुद्दीन एका कस्टम ऑफिसरच्या भूमिकेत आहे.

आर्गो

हा एका सत्य घटनेवर आधारित हॉलीवूड चित्रपट आहे. अॅक्शन व थ्रिलरने भरपूर हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. तेहरानच्या एका अॅम्बेसीवर हल्ला होतो, त्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

ऑपरेशन फिनाले

‘ऑपरेशन फिनाले’ हा ड्रामा चित्रपट २०१८ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘क्रिस वीट’ने केले होते. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

सेक्टर 36

२००६ साली नोएडामध्ये ‘निठारी हत्याकांडा’वर आधारित आहे. या चित्रपटात विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत आहे. लहान मुलांच्या हत्येवर आधारित हा चित्रपट पाहून तुम्हाला अंगावर शहारे येतील. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

बाटला हाउस

जॉन अब्राहमचा हा चित्रपट २००८ मधील बाटला हाउस एन्काउंटरवर आधारित आहे. खऱ्या घटनेवर आधारित या सिनेमात जॉन अब्राहमने डीसीपी संजीव कुमारची भूमिका केली आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भक्षक

हा क्राइम थ्रिलर चित्रपट पाहून तुमचं डोकं चक्रावेल. यात भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे, तिने पत्रकार वैशाली सिंहची भूमिका केली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.