Top Trending Shows: सध्या चित्रपटगृहांत विविध जॉनरचे, विविध भाषांतील अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तसेच ओटीटीवरदेखील अनेक रिअॅलिटी शो, वेब सीरिज, चित्रपट प्रदर्शित होत आहेत; त्यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी आहे.
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे विविध प्रकारचा कंटेट, तसेच जगभरातील विविध भाषांमधील चित्रपट, वेब सीरिज पाहण्याची संधी निर्माण झाली आहे. अलीकडील काळात ओटीटी प्लॅटफॉर्म्सना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे, त्यामुळेच अनेकदा काही चित्रपट हे थिएटरमध्ये प्रदर्शित न होता, थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होताना दिसतात.
नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, जिओ हॉटस्टार, झी ५, सोनी लिव्ह असे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या उपलब्ध आहेत. आता जर तुमच्याकडे सोनी लिव्ह ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल, तर या अॅपवर कोणते ट्रेंडिंग चित्रपट आणि शो पाहता येतील, हे जाणून घेऊ…
द हंट: राजीव गांधी असेसिनेशन केस
‘द हंट: राजीव गांधी असेसिनेशन केस’ ही ८ भागांची राजकीय थ्रिलर वेब सीरिज सध्या पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. याला आयएमडीबीने ८ रेटिंग दिले आहे.
कौन बनेगा करोडपती
दुसऱ्या क्रमांकावर कौन बनेगा करोडपती हा रिअॅलिटी शो आहे. कौन बनेगा करोडपती हा लोकप्रिय शो असून सध्या १७ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचे रेटिंग ८.१ आहे.
एशिया कपचा सामना
सध्या सुरू असलेला एशिया कपचा सामना तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महाराणी
“महाराणी” ही वेब सीरिज चौथ्या क्रमांकावर आहे. या वेब सीरिजच्या आधीच्या चार सीझनलादेखील प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. या वेब सीरिजचे रेटिंग ७.९ आहे.
स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी
स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. ही वेब सीरिज एका सत्य घटनेवर आधारित आहे. याचे रेटिंग ९.२ आहे.
‘चलो जीते हैं’
यादीत सहाव्या क्रमांकावर ‘चलो जीते हैं’ हा लघुपट आहे. याचे आयएमडीबी रेटिंग ७.३ आहे.
मायासभा: राइज ऑफ द टायटन्स
सातव्या क्रमांकावर तेलुगू भाषेतील वेब सीरिज ‘मायासभा: राइज ऑफ द टायटन्स’ आहे, ज्याचे रेटिंग ९.२ आहे.
गुल्लक
‘गुल्लक’ ट्रेडिंगमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या वेब सीरिजचे चार सीझन प्रदर्शित झाले आहेत. या वेब सीरिजला आयएमडीबीने ९.१ रेटिंग दिले आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा
तारक मेहता का उल्टा चष्मा ही सिटकॉम मालिका यादीत ९ व्या क्रमांकावर आहे, याला रेटिंग ८.२ आहे.