‘बिग बॉस ओटीटी २’ची सुरुवात झाली आहे. ‘वेड’ फेम मराठी अभिनेत्री जिया शंकर देखील या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. जियाचा हा पहिलाच रिअॅलिटी शो आहे. त्याबद्दल जियाने तिची उत्सुकता ‘बिग बॉस’च्या घरात जाण्यापूर्वी शेअर केली होती. बिग बॉसची ऑफर आल्यावर तिची प्रतिक्रिया काय होती आणि तिने या रिअॅलिटी शोमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला, याबद्दल खुलासा केला आहे.

‘आदिपुरुष’मधील ‘त्या’ दाव्यावर नेपाळची नाराजी, भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर घातली बंदी

बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी जिया शंकरने इंडिया टुडेशी संवाद साधला होता. यामध्ये तिने या शोमध्ये सहभागी होण्यामागचं कारण सांगितलं. “मला विश्वास आहे की शोमध्ये सहभागी होण्याचा मला चांगला फायदा होईल,” असं ती म्हणाली. तिला सलमान खानकडून कोणत्या गोष्टी शिकायला आवडेल, याबाबत विचारलं असता “मी त्याला वैयक्तिकरित्या ओळखत नाही. मी त्याला फक्त एक अभिनेता म्हणून ओळखते. मी ‘वीकेंड का वार’ देखील फारसे फॉलो केलेले नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करू शकत नाही. पण तो खूप स्पष्टवक्ता आहे आणि ही गोष्ट मला आवडते,” असं जिया म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Jiya Shankar (@jiyaashankarofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस ओटीटी’साठी ऑफर आल्यानंतर विचारात पडल्याचं जियाने सांगितलं. “मी रिअॅलिटी शो करावा की नाही, हा विचार मी करत होते. याचा माझं करिअर आणि आयुष्यात काय फायदा होईल, याची मला खात्री नाही. पण बऱ्याच गोष्टींचा खूप विचार केल्यानंतर मला वाटलं की हा माझ्या आयुष्यातील खूप साहसी प्रवास असेल, त्यामुळे मी होकार दिला,” असं जिया म्हणाली.