अनुराग कश्यपच्या बरोबरीनेच विक्रमादित्य मोटवानेचं नाव बॉलिवूडच्या काही यशस्वी दिग्दर्शकांच्या यादीत घेतलं जातं/ ‘लूटेरा’, ‘भावेश जोशी’सारखे हटके चित्रपट देणाऱ्या विक्रमादित्यने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही त्याची चुकून दाखवली आहे. ‘सेक्रेड गेम्स’च्या घवघवीत यशानंतर विक्रमादित्यने नुकतीच ‘जुबली’ नावाची एक वेब सीरिज सादर केली जी चांगलीच गाजली व प्रेक्षकांनी तिचं खूप कौतुक केलं.

नुकतंच ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विक्रमादित्यने त्याच्या या प्रवासाबद्दल आणि चित्रपट क्षेत्रातील अनुभवांबद्दल गप्पा मारल्या. याच मुलाखतीदरम्यान विक्रमादित्यने त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली. विक्रमादित्य लवकरच ‘तिहार जेलवर बेतलेली एक सीरिज घेऊन येणार आहे. नोव्हेंबरपासून या सीरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

आणखी वाचा : तहान, भूक विसरून ‘मन्नत’ बाहेर पाहिली शाहरुखची वाट; ३२ दिवसांनी किंग खानने दिलं चाहत्याला सरप्राईज

ही सीरिज २०१९ मध्ये आलेल्या ‘Black Warrant: Confessions of a Tihar Jailer’ पुस्तकावर बेतलेली असेल जे पत्रकार सुनीत्रा चौधरी आणि तिहार जेलचे माजी सुप्रीटेंडंट सुनील गुप्ता यांनी मिळून लिहिले आहे. याविषयी बोलताना विक्रमादित्य म्हणाला, “या पुस्तकात सुनील गुप्ता यांनी त्यांच्या ३५ वर्षांतील अनुभव मांडले आहेत. २०० पानांच्या पुस्तकावर बेतलेल्या या सीरिजमध्ये आम्ही काही बदल केले आहेत. जेल मधलं जग ही माझ्यासाठी वेगळी दुनियाच आहे. या सीरिजच्या माध्यमातून नेमकं गजाआड काय सुरू असतं ही दाखवण्याचा आम्ही एक छोटा प्रयत्न करणार आहोत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासाठी विक्रमादित्य प्रचंड उत्सुक असल्याचं सांगितलं आहे. अद्याप सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत कोण दिसणार आहे याबद्दल खुलासा झालेला नाही. याबरोबरच विक्रमादित्य अनन्या पांडेला घेऊन एक चित्रपट लोकांसमोर घेऊन येत आहे. त्या चित्रपटासाठीही विक्रमादित्य प्रचंड उत्सुक आहे.