अक्षय कुमारचा पॅडमॅन हा सिनेमा त्याच्या नावामुळे आणि एकंदर कथानकामुळेच चर्चेत आला आहे. सॅनिटरी नॅपकिनविषयीच्या मुद्दयावर ‘पॅडमॅन’ प्रकाश टाकणार आहे. या सिनेमात मासिक पाळीमध्ये महिलांना घ्यावी लागणारी काळजी आणि समाजाचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन या विषयांवर भाष्य केले जाणार आहे. पण आता याच विषयावर आधारित आणखी एक सिनेमा येतोय. या सिनेमाचं नाव आहे ‘फुल्लू’. या सिनेमात ‘फिल्मिस्तान’चा अभिनेता शारिब हाशमीची मुख्य भूमिका आहे. ‘फुल्लू’ सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये एका सॅनिटरी पॅडवर शारिब झोपलेला दिसत आहे. पोस्टरची टॅगलाइनही खूप आकर्षक आहे. ‘जो महिलेचे कष्ट समजू शकत नाही, देव त्याला पुरूष मानत नाही.’

पोस्टरवरून हे स्पष्ट कळतं की, शारिब या सिनेमात ‘फुल्लू’ नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. येत्या १६ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरआधी या सिनेमाचा अजून एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते.  या पोस्टरमध्ये अनेक सॅनिटरी पॅडवर ‘धन्यवाद फुल्लू’ असे लिहिलेले दिसत होते.

phullu-poster

या दोन्ही पोस्टरकडे पाहून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते ती म्हणजे अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ सिनेमाशी मिळता जुळता या सिनेमाची कथा आहे. ‘पॅडमॅन’ सिनेमाचे दिग्दर्शक आर बल्की यांनी केले असून ट्विंकल खन्नाने या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा तामिळनाडूमधील उद्योगपती अरुणाचलम मुरुगंतम यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. अरुणाचलम यांनी ग्रामीण भागातील महिलांना मासिक पाळीमध्ये वापरण्यासाठी स्वस्त दरातले सॅनिटरी नॅपकीन बनवले. ‘पॅडमॅन’मध्ये अक्षय कुमारसोबत राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

phullu-first-look

pad-man