बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांवर आधारित चित्रपट साकारण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. चौकटीबाहेरील कथानक हाताळत काही महत्त्वाचे मुद्दे या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येत आहेत. अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडणारी एक अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. आपल्या भूमिकांप्रमाणेच राधिका तिच्या ठाम वक्तव्यांसाठीसुद्धा ओळखली जाते. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणारी ही अभिनेत्री बऱ्याचदा काही बोल्ड फोटो पोस्ट करते. यावरच येणाऱ्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि आपल्यावर होणाऱ्या टीकांना ती नेहमीच झुगारुन लावते.

टीका करत खिल्ली उडवणाऱ्यांकडे राधिका दुर्लक्षच करचे असं वृत्त ‘डीएनए’ने प्रसिद्ध केलं आहे. काही दिवसांपूर्वीच तिने समुद्रकिनारी निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतानाचा फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये ती बिकीमध्ये दिसत होती. पण, तिच्या या फोटोवर अनेकांनीच संमिश्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. यावरच राधिकाने तिचं मत स्पष्टपणे मांडत टीकाकारांना झुगारुन लावलं होतं.

वाचा : VIDEO : तरुणाईला वेड लावणाऱ्या प्रियाचं ‘ते’ भुवई उंचावणं चोरीचं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तो फोटो ट्रोल होतोय याबद्दल मला काही ठाऊकच नव्हतं. कोणा दुसऱ्याच व्यक्तीकडून मला याविषयीची माहिती मिळाली होती. ही किती विचित्र परिस्थिती आहे? समुद्रकिनारी असताना आता मी साडी नेसावी अशी त्या लोकांची अपेक्षा आहे का?’, असा प्रश्न तिने उपस्थित केला. माझी खिल्ली कोणी उडवली, ते काय करतात याविषयी मला काहीच माहित नाही. कारण मला त्यांच्याशी काही घेणंदेणं नाही. त्यामुळे मुळात मी त्यांच्याकडे लक्षच देत नाही, असं म्हणत टीकाकारांना तिने खडे बोल सुनावले आहेत.