भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं काल ६ फेब्रुवारी रोजी निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. फक्त भारतात नाही तर जो पाकिस्तान कधीच कोणत्या गोष्टीवर सहमत नसतो. त्या पाकिस्तान देशातील लोकांना देखील लतादीदींच्या जाण्याचे दुख: आहे. संगीताच्या जगात अनेक दिग्गज जन्माला आले, पण लतादीदींपेक्षा खास असं कोणी आपल्याला पाहायला मिळालं नाही.

लतीदीदींचा आवाज ऐकल्यानंतर प्रत्येकाचे मन शांत होऊन जात होतं. त्यांचा आवज हा फक्त आपल्या कानाला नाही तर आपल्या मनाला तृप्त करायचा. पण तुम्हाला माहित आहे का? पाकिस्तानने ऑल इंडिया रेडिओला पत्र लिहित भारत काश्मिर ठेवू शकतो पण त्या बदल्यात आम्हाला लता मंगेशकर पाहिजे असे म्हटले होते.

आणखी वाचा : “पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको कारण…”, लतादीदींचा जुना व्हिडीओ व्हायरल

लता मंगेशकर यांच्या चाहत्यांमध्ये सर्वसामान्यच नव्हे, तर अनेक दिग्गजांचाही समावेश आहे. लतादीदी यांचे पाकिस्तानमध्येही चाहते आहेत. पाकिस्तानी जनतेसाठी लतादीदी किती महत्त्वाच्या होत्या हे आपल्याला या पत्रावरून तर दिसून आले आहे. भारतात राहूनही त्यांना पाकिस्तानी लोकांच्या मनावर राज्य केलं.

Photo : घरात दोनचं खुर्च्या? भारती सिंगचे आलिशान घर पाहिलेत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काल लतादीदींच्या निधनानंतर पाकिस्तान जनतेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. लतादीदींनी त्यांच्या करिअरमध्ये ३० हजार पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. काल लतादीदींवर मुंबईतील दादर परिसरात असलेल्याशिवाजी पार्क इथे अंत्यसंस्कार करण्यात आले.