पाकिस्तानी मालिका ‘तेरे बिन’ला भारतीय प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत असतानाच आता या मालिकेवर सध्या प्रेक्षक प्रचंड चिडले असल्याचं समोर आलं आहे. या मालिकेत आता ‘वैवाहिक बलात्कार’ दाखवण्यात येणार असल्याची चर्चा आहे आणि आगामी भागाचा प्रोमो पाहिल्यानंतर चाहते आणखीनच विचारात पडले आहेत. निर्मात्यांनी या मालिकेची कथा खराब केल्याचे आरोप चाहत्यांनी केले आहेत.

या सर्व वादांबद्दल मालिकेच्या लेखिका नूरन मखदूम यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, मात्र त्यांनी केलेलं वक्तव्य ऐकून प्रेक्षक आणखी हैराण झाले आहेत. तेरे बिन मालिकेच्या ४६ व्या भागाच्या शेवटच्या सीनमध्ये, मुर्तसिम खान (वाहज अली) त्याची पत्नी मीराब (युमना जैदी)बरोबर काहीतरी गैरवर्तन करणार असल्याचे दाखवण्यात आले होते. तो बेडरूमचा दरवाजा बंद करतो आणि एपिसोड तिथेच संपतो. त्यानंतर आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये बायकोबरोबर केलेल्या गैरवर्तनाचा पश्चात्ताप त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. हा सीन पाहून या मालिकेचे बरेच चाहते नाराज आहेत.

आणखी वाचा : विजयवाडा येथे ज्युनिअर एनटीआरच्या चाहत्यांचा धिंगाणा; फटाके फोडल्याने चित्रपटगृहात लागली आग

नूरन मखदूम यांनी अरब न्यूजला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले की, “ही अशी परिस्थिती कथानकाची गरज होती, आणि यावरच कथेचा शेवट अवलंबून आहे. जर प्रेक्षकांना ही गोष्ट समजू शकत नसेल तर मी ते बदलू शकत नाही. हे फक्त नाटक आहे. प्रत्येक गोष्टीत वाद उकरून काढण्याऐवजी प्रेक्षकांनी संपूर्ण कथानक उलगडण्याची वाट पाहावी.” सोशल मीडियावर प्रेक्षकांनी त्यांचा राग व्यक्त करत त्यांची मतं मांडली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे केलेल्या वक्तव्यामुळे प्रेक्षक आणखी चिडले नूरन मखदूम यांनी पुढे म्हटलं, “छोट्या पडद्यावर ही गोष्ट प्रथमच पाहायला मिळत आहे असं अजिबात नाही. या मालिकेला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे यातील काही गोष्टींवर लोक टीका करत आहेत इतकंच. अशा गोष्टी आधीदेखील बऱ्याचदा दाखवण्यात आल्या आहेत. ही प्रसिद्ध पाकिस्तानी मालिका तुम्ही Gio TV वर पाहू शकता. भारतात तुम्ही ती यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. ही मालिका २८ डिसेंबर २०२२ पासून सुरू आहे आणि भारतीय प्रेक्षक आवडीने ही मालिका बघतात.