छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. ती कधी तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असते तर कधी खासगी आयुष्यामुळे. श्वेताची लाडकी मुलगी म्हणजेच पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पलक तिवारी लवकरच ‘रोजी: द केसर चॅप्टर’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकतंच एका मुलाखतीत पलकने तिची आई श्वेताला वैवाहिक आयुष्यातील संघर्षाबद्दल भाष्य केले आहे. ‘मला तिच्याकडून खूप काही शिकायला मिळाले आहे’, असे पलक तिवारी या मुलाखतीदरम्यान म्हणाली. आपल्या आईच्या वैवाहिक आयुष्याबद्दल तिने काही खुलासेही केले आहेत.

श्वेता तिवारीनं १९९९ मध्ये राजा चौधरीशी लग्न केलं होतं. त्यानंतर एका वर्षानं पलकचा जन्म झाला होता. २००७ साली हे दोघंही विभक्त झाले. त्यानंतर २०१३ साली अभिनव कोहलीसोबत श्वेता पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकली. पण तिचं हे लग्न देखील फार काळ टिकलं नाही आणि २०१९ मध्ये एका वाईट वळणावर येऊन ते संपलं. अभिनव कोहलीपासून श्वेताला एक मुलगा आहे. अभिनवपासून विभक्त झाल्यानंतर श्वेता आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ एकटीच करत आहे.
आणखी वाचा : सोनम कपूरच्या मुलाची पहिली झलक, बाळाचे खास फोटो पाहिलात का?

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पलक तिवारीनं तिच्या आईचं वैवाहिक जीवन आणि त्यातील संघर्षाबद्दल सांगितलं. आई श्वेता तिवारीनं कशाप्रकारे तिच्या आयुष्यातील समस्यांचा सामना केला. यात पलक म्हणाली, “मला असं वाटतं की कोणीही लग्न करताना घाई करणं चुकीचे आहे. कोणताही निर्णय घेताना त्याबद्दल पूर्ण विचार करायला हवा. त्यानंतरच अंतिम निर्णय घ्यायला हवा. मी याचा अनुभव घेतला आहे. एखाद्या व्यक्तीसोबत घाईघाईत लग्न करण्याचा निर्णय घेणे अतिशय चुकीचे आहे. तसेच जर तुम्हाला ती व्यक्ती चुकीची वाटत असेल किंवा तुमच्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटतं असेल तर मग तुम्ही त्या व्यक्तीपासून दूर होणं कधीही चांगलं.”

श्वेता तिवारीच्या लेकीचे बोल्ड फोटोशूट चर्चेत, संगीता बिजलानी कमेंट करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“या सर्व गोष्टींमध्ये महिलांना फार संघर्ष करावा लागतो. मी हे फक्त माझ्या आईसोबत घडताना पाहिलं नाही तर इतर अनेक महिलांसोबत घडताना पाहिलं आहे. आम्ही आपली बाजू लोकांना समजावून सांगण्यात वेळ घालवत नाहीत. माझ्या आईचे प्राधान्य तिचे कुटुंब सुरक्षित ठेवणे आहे आणि मी सुद्धा यावरच जास्त लक्ष देते”, असे पलक तिवारी म्हणाली.