छोट्या पडद्यावरील अभिनेता पारस छाबडा हा ‘बिग बॉस १३’ या रिअॅलिटी शोमधून प्रकाश झोतात आला. पारस हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. पारस आता पर्यंत अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसला आहे. आता लवकरच तो एका नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. दरम्यान, एका मुलाखतीत पारसने त्याला मिळणाऱ्या भूमिकांविषयी चर्चा केली.
पारसने नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत पारसने त्याला मिळणाऱ्या भूमिकांविषयी सांगितले आहे. “मला ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करायचं आहे. त्यासाठी मला ऑफर देखील येत आहेत. मात्र, कोणत्या ही प्लॅटफॉर्मवर मर्यादा असू शकत नाही पण माझ्या स्वत: च्या काही मर्यादा आहेत. मला असे प्रोजेक्टस मिळत आहेत ज्यात बोल्ड सीन आहेत. पण मला वाटतं अशा सीनची खरं तर शोमध्ये फारशी गरज नसते. स्टोरी लाइन आणि बोल्ड सीनमध्ये कोणत्याही प्रकारचं कनेक्शन नसतं. शोमध्ये मसाला म्हणून असे सीन शक्यतो वापरले जातात. यामागचा हेतू हा शोची चर्चा व्हावी असा असतो,” असं पारस म्हणाला.
View this post on Instagram
View this post on Instagram
तो पुढे म्हणाला, “बोल्ड होण्याच्या प्रयत्नात मेकर्स आजकाल कलाकारांना चुकीच्या पद्धतीने दाखवत आहेत. मला पॉर्नस्टार नाही अभिनेता व्हायचं.”
आणखी वाचा : जेनेलियासोबत वेळ घालवत असलेल्या रितेशला जेव्हा कळाले की…
दरम्यान, पारसने ‘बिग बॉस १४’ मध्ये स्पर्धक आणि अभिनेत्री देवोलिना भटाचार्जीचे समर्थन करण्यासाठी एण्ट्री केली होती. तर, ‘बिग बॉस १४’ ची विजेती रुबिना दिलेकसोबत एका म्युजिक व्हिडीओमध्ये दिसला होता.