दाक्षिणात्य अभिनेत्यांचे त्यांच्या चाहत्यांसोबत एक खास नाते असते. पण कधी कधी चाहत्यांचे प्रेम हे अभिनेत्यांना महागात पडते. दाक्षिणात्य अभिनेता पवन कल्याण हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. पवन कल्याण यांचे लाखो चाहते आहेत. पवन कल्याण यांच्यासोबत अशीच एक घटना घडली आहे. पवन कल्याण फक्त अभिनेते नाही तर ते राजकारणी देखील आहेत. ते जनसेना पक्षाचे प्रमुखही आहेत.

पवन कल्याण यांच्यासोबत एक घटना घडल्याने अपघातातून थोडक्यात बचावले. एका चाहत्याच्या उत्साहामुळे ते गाडीतून खाली पडण्यापासून बचावले. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पवन कल्याण त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमादरम्यान रोड शो करत होते. यावेळी त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवन कल्याण त्यांच्या कारवर चढून लोकांना अभिवादन करत होता, तेव्हा तिथे एक अतिउत्साही चाहता पवन कल्याण यांच्या कारवर चढला आणि त्यांना मिठी मारण्याच्या प्रयत्न त्याने केला. यावेळी त्याचा तोल गेल्याने दोघेही घसरले. पण पवण कल्याण गाडीवर पडले. पवन कल्याण जर खाली पडले असते तर त्यांना दुखापत झाली असती. पण सुदैवाने ते खाली पडले नसून गाडीवर पडले आणि त्यांनी काही झाले नाही.

आणखी वाचा : “मुलाखती देऊनही आम्हाला… ”,‘गंगुबाई’मधील दृश्यांवरुन कामाठीपुरामधील स्थानिकांची चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

आणखी वाचा : “परत असं घोड्यावर बसायचं नाही”, अमोल कोल्हेंना मिळाली तंबी

पवन कल्याण सध्या सुखरूप आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. अशा घटना घडू नयेत, ही सुरक्षा रक्षकांची जबाबदारी आहे. पवन कल्याण राजकारणासोबतच चित्रपटांमध्येही सक्रिय आहेत. ते त्यांच्या पक्षाच्या प्रचार कार्यक्रमातही सक्रियपणे सहभागी होतात. रोड शो दरम्यान घडलेल्या या घटनेबद्दल पवन कल्याण किंवा त्यांच्या पक्षाकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

आणखी वाचा : श्वेता बच्चनने शेअर केला आई आणि मुलीसोबतचा खास फोटो, म्हणाली “तू…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरं बोलायचं झालं तर, पवन कल्याण सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘भीमला नायक’मुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात ते पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत राणा दग्गुबती, नित्या मेनन आणि संयुक्ता मेनन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सागर के चंद्रा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर लवकरच हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित होणार आहे.