अभिनेत्री गौहर खान नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहत आपलं मत मांडत असते. व्यवसायिक, समाजिक पातळीवर घडणाऱ्या अनेक घटनांवर ती भाष्य करत एखादी गोष्ट तिला खटकली किंवा आवडली ते सांगत असते. आताही एका चर्चेत असणाऱ्या मुद्द्यावर तिने आपलं मत मांडत हल्ली लोकांच्या भावना कोणत्याही गोष्टीवरून दुखावल्या जातात असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी रणबीर-आलिया आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे यूट्यूबवर प्रमोशन करत होते. यादरम्यान रणबीरने आलियाच्या गरोदरपणात वाढलेल्या वजनाची खिल्ली उडवली. त्यानंतर रणबीर सोशल मीडियावर खूप ट्रोल झाला होता. यावर आता अभिनेत्री गौहर खान व्यक्त झाली आहे.

आणखी वाचा : अक्षय कुमारने दिला अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला मोलाचा सल्ला, व्हिडीओ व्हायरल

What is gaslighting in a relationship
समुपदेशन : तुम्ही आहात विचारांचे बळी?
Shashi Tharoor Exit polls Congress Opposition performance loksabha elextion 2024
एक्झिट पोल्स फारच हास्यास्पद! आमच्या कामगिरीत किमान सुधारणा तरी होईलच : शशी थरूर
Loksatta vyaktivedh Odisha Central Sangeet Natak Akademi Award Kunar
व्यक्तिवेध: मागुनिचरण कुंअर
Loksatta samorchya bakavarun political situation Election Govt voting
समोरच्या बाकावरून: परिवर्तनवादी विरुद्ध ‘जैसे थे’वादी!
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : मस्तवाल अधिकारी, निडर धनाढ्य!
meditation, Kanyakumari rock memorial, prime minister narendra modi
मोदींच्या नव्या ध्यानमग्न छायाचित्राच्या प्रतीक्षेत…
Considering the physical and mental changes in a woman life
नेहमी बाईलाच का जबाबदार धरलं जातं?
Hindu marriage- legal rights
विवाह अवैध ठरला तर पोटगीसारखे कायदेशीर हक्क गमवावे लागणार का?

गौहरने एका ट्विटमध्ये लिहिले, “हल्ली लोकं जरा जास्तच संवेदनशील झाली आहेत. आता आपल्या पत्नीची थोडी हलकी फुलकी मस्करी करायलाही बंदी आहे. कुणास ठाऊक कोणाच्या भावना केव्हा दुखावल्या जातील! सगळं थोडं हलक्यात घ्या. तसं झाल्याने जगातल्या अनेक समस्या सुटतील.”

तिच्या या पोस्टवर काहींनी तिची बाजू घेत तिला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी तिच्या या मताला विरोध दर्शवत हे असे विनोद करणे म्हणजे पब्लिसिटी स्टंट्स आहेत असे म्हटले आहे.

हेही वाचा : धर्मामुळे कुशल टंडनसोबत ब्रेकअप केलं म्हणणाऱ्या गौहर खानचं चोख उत्तर, म्हणाली “Hey Loser, मी मुस्लीम आहे…”

‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनच्या लाइव्ह सेशनदरम्यान आलिया म्हणाली, आम्ही चांगल्या लेव्हलवर चित्रपटाचे प्रमोशन करू, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ. पण सध्या आम्ही जास्त ठिकाणी पोहोचू शकत नाही, कारण आमचं लक्ष दुसरीकडे आहे. याच दरम्यान, रणबीर आलियाच्या बेबी बंपकडे बोट दाखवत कारण आता कोणी पसरतंय (वजन वाढतंय या अर्थाने) असं म्हणाला. यावरून रणबीरच्या या जोकवर सोशल मीडिया यूजर्सनी त्याला धारेवर धरलं होतं. तो भावना नसलेला आणि असंवेदनशील आहे, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं होतं. याच गोष्टीवर गौहरने रणबीरची बाजू घेऊन नेटकऱ्यांना टोला लगावला आहे.