हेमा कमिटीच्या रिपोर्टमुळे मल्याळम सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. तमिळ व तेलुगू सिनेसृष्टीतील कलाकारही याबाबत प्रतिक्रिया देत आहेत. अशातच तेलुगू अभिनेता राज तरुणवर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. लावण्या असं तिचं नाव आहे. राज तरुणने लग्नाचे आमिष दाखवून ११ वर्षांच्या नात्यात तिची फसवणूक केली, असा दावा तिने जुलै महिन्यात केलेल्या तक्रारीत केला होता. आता याप्रकरणी नरसिंगी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.
तेलंगणा टुडेच्या वृत्तानुसार लावण्याने राज तरुण याच्यावरील आरोपांशी संबंधित सर्व पुरावे पोलिसांना दिले आहेत. त्याआधारे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. लावण्याने राज तरुणवर जबरदस्तीने गर्भपात करायला लावला असा आरोपही केला होता. दाखल केलेल्या आरोपपत्रात लावण्याच्या वैद्यकीय रिपोर्ट्सचा समावेश आहे. त्यानुसार लावण्याचा गर्भपात झाला होता. तसेच तिने पोलिसांना पुरावे जे पुरावे दिले त्यानुसार राज तरुण लावण्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होता तरी सहकलाकार मालवी मल्होत्राशी अफेअर होते.
बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, तीन वर्षांपूर्वी बिझनेसमनशी केलंय लग्न
लावण्याने दिले पुरावे
तक्रारीत लावण्याने दावा केला होता की तिचे आणि राज तरुणचे लग्न झाले होते. मालवी मल्होत्रा आणि तिच्या भावाने धमकी दिली, त्यानंतर पोलिसांत तक्रार दिली असं लावण्याने म्हटलं होतं. दुसरीकडे राज तरुणने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. लावण्याला ड्रग्जचे व्यसन असल्याचं तो म्हणाला होता. या प्रकरणात राज तरुणला ऑगस्टमध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला होता. आता लावण्याने पुरावे दिल्यानंतर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.
‘साथ निभाना साथिया’ फेम मराठमोळ्या रुचाचा पती काय काम करतो? तिची लेक कशी दिसते? जाणून घ्या
लग्न झालंय हे कुटुंबियांना माहीत आहे – लावण्या
“आमचं लग्न झालं आहे हे आमच्या कुटुंबियांना हे माहीत आहे पण गेल्या सप्टेंबरपासून त्याला माझ्याबरोबर राहायचं नाही. आम्ही जवळपास १५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, त्यापैकी ११ वर्षे आम्ही एकत्र आहोत. मला त्याचे पैसे नको आहेत, कारण त्याच्याकडे पैसे नव्हते त्याआधीपासून मी त्याला ओळखते. मालवी मान्य करणार नाही पण त्यांचे अफेअर आहे आणि तिच्यासाठीच तो मला सोडतोय,” असा दावा टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत लावण्याने केला.
प्राजक्ता माळीच्या सिनेमातील नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेतील ‘या’ मराठी अभिनेत्याला ओळखलंत का?
राज तरुणबद्दल बोलायचं झाल्यास ३२ वर्षीय या अभिनेत्याने आतापर्यंत’ ‘लव्हर’, ‘तिरंगबदरा स्वामी’, ‘उयाला जम्पाला’, ‘कुमारी २१ एफ’, ‘ना सामी रंगा’, ‘पुरुषोत्तमुडू’, ‘एडो राकम आडो राकम’, ‘सिनेमा चुपिस्ता मावा’, ‘ओरे बुजिग्गा’, ‘किट्टू उनाडू जगरता’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.