नर्तिका गौतमी पाटील गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. कार्यक्रमातील गौतमीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. स्टेजवरच अंगावर पाणी ओतून डान्स करत विभत्स हावभाव करताना गौतमी व्हिडीओत दिसली होती. त्यानंतर गौतमीच्या कार्यक्रमांत चाहत्यांनी धुमाकूळ घालून हाणामारी झाल्याचे व्हिडीओही समोर आले होते.

गौतमीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली होती. अनेकांनी गौतमीच्या डान्सवरही आक्षेप घेतला होता. गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच इंदुरीकर महाराजांनीही गौतमी पाटीलबाबत वक्तव्य केलं होतं. या सगळ्या प्रकारानंतर आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Chandrashekhar Bawankule,
धैर्यशील मोहिते पाटलांच्या राजीनाम्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शरद पवारांचा…”
Eknath Shinde Speech in Nagpur
“बाळासाहेब ठाकरेंनी नितीन गडकरींना दिलं होतं टोपणनाव”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषणात सांगितला ‘तो’ किस्सा
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”

हेही वाचा>> ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाचा सिक्वेल येणार का? नागराज मंजुळे म्हणाले…

तृप्ती देसाईंनी नुकतीच वाढीव कट्टाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना गौतमी पाटीलबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत त्या म्हणाल्या, “गौतमी पाटील सर्वसामान्य घरातून आलेली मुलगी आहे. तिला पाठिंबा देणं गरजेचं आहे. राजकीय नेते, इंदुरीकर महाराज जेव्हा तिला विरोध करतात, तेव्हा सर्वसामान्य जनता तिच्यामागे उभी राहते. कारण ती एका गरीब घरातून आलेली आहे. पण महिला म्हणून तिला पाठिंबा देणं गरजेचं आहे.”

हेही वाचा>> Video: केक कापला, मिठी मारली, किस केलं अन्…; अंकिता लोखंडेचा पतीबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> Video: डान्स, अ‍ॅक्शन सीन्स, थरार अन्…; गौतमी पाटीलच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित

दरम्यान, नृत्यामुळे प्रसिद्धी मिळवलेल्या गौतमी पाटील चित्रपटातही झळकणार आहे. ‘घुंगरू’ या मराठी चित्रपटातून गौतमी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलावंतांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट असून याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.