scorecardresearch

लग्नाच्या काही तासातच लोकप्रिय गायकाचं निधन, संसार सुरू होण्याआधीच काळाने घातला घाला

प्रसिद्ध गायक जेक फ्लिंट यांचं लग्नानंतर काही तासांतच निधन, पत्नीने शेअर केली भावूक पोस्ट

लग्नाच्या काही तासातच लोकप्रिय गायकाचं निधन, संसार सुरू होण्याआधीच काळाने घातला घाला
लोकप्रिय गायक जेक फ्लिंट यांचं लग्नानंतर काही तासांतच निधन झालं आहे. (फोटो: जेक फ्लिंट/ इन्स्टाग्राम)

लोकप्रिय गायक जेक फ्लिंट यांचं लग्नानंतर काही तासांतच निधन झालं. जोडीदाराबरोबर सुखी आयुष्याची स्वप्न त्यांन पाहिली होती. परंतु, त्याआधीच मृत्यूने त्यांना गाठलं. लग्नानंतर काहीच तासांनी पतीचं निधन झाल्याने जेक फ्लिंट यांच्या पत्नीचे स्वप्नभंग झाले.

३६ वर्षीय जेक फ्लिंट हे ब्रेंडा यांच्यासह २६ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकले होते. त्यांनंतर काही तासांतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जेंक फ्लिंट यांना नातेवाईक व मित्रपरिवाराने श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या पत्नीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

“आता आपण आपल्या लग्नाचे फोटो पाहिले पाहिजे होते. परंतु, माझ्या पतीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कपडे मला शोधावे लागत आहेत. आता मला हे सहन होत नाहीये. तुम्ही प्लीज परत या. मला त्याची गरज आहे. मला अजून काहीच नको” असं ब्रेंडाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> ४९व्या वर्षी मलायका अरोरा होणार अर्जुन कपूरच्या बाळाची आई?

हेही पाहा>> Photos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो

जेक फ्लिंट हे लोकप्रिय गायक होते. २०१६ साली त्यांनी आय एम नॉट ओके हा त्यांचा पहिला अल्बम प्रदर्शित केला होता. त्यानंतर २०२०मध्ये दुसरा अल्बम घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. २०२१मध्ये त्यांनी लाइव्ह रेकॉर्डिंगची एक सीरिजही प्रदर्शित केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 17:41 IST

संबंधित बातम्या