श्रेयस तळपदेच्या यशाची चढती कमान विलक्षण कौतुकाची असल्याची आणखी एक गोष्ट..
‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटाच्या निर्मितीत त्याने पाऊल टाकल्याची बातमी जरा कुठे पसरते न पसरते तोच हा चित्रपट पूर्णदेखील झाला. अर्थात, चित्रीकरणाच्या तारखा व तांत्रिक करामतीची योग्य खेळी यातून हे साध्य झाले. आता तर त्याने ४ जुलै ही आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील निश्चित केली.
अर्थात आता दणकेबाज पूर्वप्रसिद्धी व देखणे भव्य प्रदर्शन अशी महत्त्वाची पावले पडतील.
हे करायचे तर प्रशस्त कार्यालय हवे ना? गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्याने अंधेरीतच आपल्या चकचकीत कार्यालयाची स्थापना केली. ‘पोस्टर बॉय’चे नवे व लक्षवेधी पोस्टरही त्यात लावले. आता चित्रपटाचे स्वरूप, प्रदर्शनाची तारीख व प्रभावी आयोजन यांचा योग्य मेळ घालण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न सुरू झालेतही.म्हटलं ना, श्रेयस तळपदेच्या यशाची चढती कमान विलक्षण कौतुकाची आहे म्हणून.. इक्बाल, सनई चौघडे, ओम शांती ओम अशा महत्त्वाच्या पावलांनंतरचे हे त्याचे लक्षवेधी पाऊल.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2014 रोजी प्रकाशित
श्रेयस तळपदेचा धडाका..
रेयस तळपदेच्या यशाची चढती कमान विलक्षण कौतुकाची असल्याची आणखी एक गोष्ट..‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटाच्या निर्मितीत त्याने पाऊल टाकल्याची बातमी जरा कुठे पसरते न पसरते तोच हा चित्रपट पूर्णदेखील झाला.
First published on: 13-04-2014 at 02:42 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poster boys of shreyas talpade