अभिनेता प्रभास याच्याच नावाची सध्या चर्चा आहे. ट्रेड मार्केटमधील काही कंपन्या त्यांच्या उत्पादनांची जाहिरात प्रभासने करावी आणि ब्रॅण्ड अॅम्बेसेडर व्हावे यासाठी त्याच्याकडे रांगा लागल्या जात आहेत. या शर्यतीमध्ये जिओनी कंपनीने बाजी मारल्याचे दिसते. चीनमधील या स्मार्टफोन कंपनीने ‘बाहुबली’ फेम प्रभासची ब्रॅण्ड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती केली आहे. याआधीच विराट कोहली, आलिया भट्ट, श्रुती हसन, डल्कर सलमान आणि दिलजीत दोसांज हे प्रसिद्ध चेहरे जिओनी कंपनीशी जोडले गेलेले आहेत.
जिओनीचे सीईओ आणि एमडी अरविंद आर वोहरा म्हणाले की, प्रभाससोबत आम्ही हातमिळवणी केल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. प्रभासची निवड ‘स्ट्राँगर बॅटरी अॅण्ड बेटर सेल्फी’ या आमच्या विधानाला सार्थक अशी आहे.
वाचा : ”बाहुबली २’ बघण्यासाठी मी १० रुपयेसुद्धा खर्च करणार नाही’
‘बाहुबली’चे चित्रीकरण २०११ मध्ये सुरु झाले होते. अगदी २०१७ च्या जानेवारीपर्यंत हे चित्रीकरण सुरु होते. ‘बाहुबली’च्या दोन भागांसाठी समर्पणाने काम करण्यासाठी त्याने या पाच वर्षात प्रभासने दुसरा कोणताच चित्रपट स्वीकारला नाही. इतकंच नव्हे तर, एसएस राजामौलीसह काम करत असताना त्याने १८ कोटी रुपयांची जाहिरात नाकारल्याचेही म्हटले जाते. त्यामुळे त्याला आर्थिक टंचाईचाही सामना करावा लागला. लागोपाठ तीन हिट चित्रपट देणाऱ्या प्रभासकडे निर्मात्यांच्या रांगा लागल्या होत्या. तो बोलेल तितके मानधन ते द्यायला तयार होते. पण, त्याने केवळ ‘बाहुबली’वर त्याचे लक्ष केंद्रीत केले. ‘बाहुबली’साठी निर्मात्यांकडून आपल्याला हवे तितके मानधन न मागता ते जितकं मानधन देतील ते घ्यावे अशी सक्त ताकीदही त्याने आपल्या मॅनेजरला दिली होती, असे राजामौली म्हणाले होते.
वाचा : अलका कुबल- आठल्येंच्या मुलीची गगन भरारी
दरम्यान, प्रभासच्या या अथक परिश्रमाचे चीज झाले आहे. यासाठी राजामौलीने त्याला २५ कोटी रुपये मानधन दिल्याचंही म्हटलं जातंय. चित्रपटाच्या सर्व कलाकारांमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांमध्ये त्याचेच नाव घेतले जातेय. अमेरिकेत जवळपास एक महिना सुट्टी घालवल्यानंतर प्रभास आता भारतात परतला असून, लवकरच साहोच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.
