मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचं मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी सुवर्णरेहा जाधव यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – Video : महादेवाचं दर्शन घेण्यासाठी शिखर शिंगणापूरला पोहोचली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

याआधी प्रदीप पटवर्धन आणि सुवर्णरेहा यांचा मुलगा श्रीतेज पटवर्धनने देखील वडिलांचा जुना फोटो शेअर केला. तसेच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यानंतर प्रदीप यांची पूर्वाश्रमीची पत्नी सुवर्णरेहा यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

“९ ऑगस्ट २०२२ रोजी माझा मुलगा श्रीतेजचे वडील आणि माझे पूर्वाश्रमीचे पती प्रदीप पटवर्धन यांचे निधन झालं. हे सांगताना मला अतिशय दुःख होत आहे. प्रदीप हे उत्तम वडील आणि माझे चांगले मित्र होते. प्रतिभावान, यशस्वी अभिनेता म्हणून त्यांनी नाटक तसेच चित्रपटाद्वारे प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं. प्रदीप खूप लवकर आम्हाला सोडून गेले. कायम त्यांची आठवण येत राहील.” असं सुवर्णरेहा यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा – Video : “माझे स्तन तापसीपेक्षा…” अनुराग कश्यपचं ‘ते’ विधान चर्चेत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मराठीत लोकप्रिय ठरलेल्या मोजक्या विनोदी अभिनेत्यांमध्ये प्रदीप पटवर्धन यांचं नाव आवर्जून घेतले जाते. गिरगाव येथे राहणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना एकांकिका स्पर्धांमध्ये काम केलं होतं. चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख असलेले प्रदीप पटवर्धन त्यानंतर व्यावसायिक नाटकांकडे वळले. १९८५ साली आलेल्या सुयोग निर्मित ‘मोरूची मावशी’ या नाटकात अभिनेता प्रशांत दामले यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. या नाटकातील भूमिकेने त्यांना खऱ्या अर्थाने अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली.