मराठी सिनेसृष्टीमधील सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि आज तिने कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर तर ती फारच सक्रिय असते. ती बऱ्याचवेळा तिच्या कुटुंबासोबत फोटो शेअर करताना दिसते. दरम्यान आता प्राजक्ताने तिच्या आजी-आजोबांसह एक फोटो शेअर केला असून त्यांच्या खास प्लॅन विषयी सांगितले आहे.

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्राजक्ता तिचे आजी- आजोबा सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेल्याचे दिसते आहे. या सोबत प्राजक्ताने तिचा प्रवीण तरडेंसोबतचा महाराष्ट्राची हास्यजत्रेतला फोटो शेअर केला आहे. हे फोटो शेअर करत प्राजक्ताने प्रवीण तरडे आणि ‘सरसेनापती हंबीरराव’च्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.

आणखी वाचा : करण जोहरच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या आले समोरा-समोर, अन् अभिषेकने केले असे काही…

आणखी वाचा : “मी झोपडपट्टीत वाढलोय…”, ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचे वक्तव्य चर्चेत

हे फोटो शेअर करत “एक दिवस आजी-आजोबांसोबत.. आणि आम्ही ‘सरसेनापती हंबीरराव’ पाहिला. कौतुकाला शब्द अपूरे पडतील, इतका अप्रतिम झालाय चित्रपट. प्रविण दादा तू भारी आहेस, विषय कट. २.३० तासात तू दोन महाराजांची, त्यांच्या सरसेनापतीची, अंतर्गत राजकारणाची, स्वराज्याची गोष्ट; ज्या हुशारीनं दाखवलीस त्याला तोडच नाही. तुझ्यातला प्रेमळ, समंजस, दूरदृष्टी असणारा गोड माणूस लेखनात उतरला.. आणि त्याने आम्हांला कितीतरी शिकवलं. त्यासाठी किती धन्यवाद देऊ? #केवळप्रेम महेश लिमये नेहमीप्रमाणे कडक कामगिरी. गश्मिर महाजनी आणि श्रुती मराठे मोहिम यशस्वी. प्रत्येक मराठी माणसानं बघितलाच पाहिजे असा हा चित्रपट. (मी पुन्हा किमान दोनदा तरी पाहणार आहे..) आजी- आजोबा एकदम खूश…”, असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : “…म्हणून मी गांजाचं सेवन केलं होतं”, आर्यन खानने स्वत: NCB कडे केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्राजक्ता माळी सध्या ‘रानबाजार’ या तिच्या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. यामधील बोल्ड दृश्यांमुळे टीजरपासूनच प्राजक्ताची चर्चा होती.