scorecardresearch

Premium

“…म्हणून मी गांजाचं सेवन केलं होतं”, आर्यन खानने स्वत: NCB कडे केला खुलासा

ड्रग्ज प्रकरणी NCB ची आर्यन खानला क्लीन चिट

aryan khan, ganja, aryan khan drugs case
ड्रग्ज प्रकरणी NCB ची आर्यन खानला क्लीन चिट

प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) एनसीबीने (NCB) मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. एनसीबीने आर्यन खानसह ६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले नाही. या प्रकरणात आतापर्यंत एनसीबीने १० व्हॉल्यूमचे ६००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान आणि महककडे ड्रग्ज सापडलं नव्हतं. पण आर्यनने चौकशी दरम्यान कबूल केले होते की त्याने अमेरिकेत शिकत गांज्याचे सेवन करत होता.

आता एनसीबीच्या आरोपपत्रात असे समोर आले आहे की, “२०१८मध्ये अमेरिकेत शिकत असताना तो गांज्याचे सेवन करत होता. त्याला स्लीपिंग डिसऑर्डर असल्यामुळे गांज्याचे सेवन केल्याचे आर्यन म्हणाला होता. याव्यतिरिक्त त्याने सांगितले की इंटरनेटवर असलेल्या काही आर्टिकल्समध्ये त्याने वाचले की स्लीपिंग डिसऑर्डरसाठी गांजा उपयुक्त आहे.” एनसीबीने म्हटले आहे की, “आर्यन खानने दुसर्‍या एका निवेदनात कबूल केले की त्याच्या फोनमध्ये सापडलेले व्हॉट्सअॅप ड्रग चॅट हे त्याने केले होते.”

आणखी वाचा : “मी झोपडपट्टीत वाढलोय…”, ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचे वक्तव्य चर्चेत

आर्यन खान प्रकरणातील नेमक्या घडामोडी काय?

एनसीबीने आर्यन खानसह ६ जणांना पुरावे न मिळाल्याने क्लिन चीट देताना या प्रकरणातील घटनाक्रमाची माहितीही दिली आहे. याप्रमाणे, एनसीबीने २ ऑक्टोबर २०२१ रोजी आर्यन, अरबाज, इशमत आणि गोमितला इंटरनॅशनल पोर्ट टर्मिनल येथून ताब्यात घेतलं. नुपूर, मोहक आणि मुनमुनला कोर्डिला क्रुझवरून ताब्यात घेण्यात आलं. यापैकी आर्यन आणि मोहक वगळता सर्वांकडे ड्रग्ज सापडले.

आणखी वाचा : करण जोहरच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या आले समोरा-समोर, अन् अभिषेकने केले असे काही…

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई एनसीबीने केला. नंतर ६ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रकरणाचा तपास मुंबई एनसीबीकडून काढून एनसीबीच्या विशेष तपास पथकाकडे देण्यात आलं. एसआयटीने १४ आरोपींविरोधात तपास केला. तपासात ६ जणांविरोधात पुरेसे पुरावे न मिळाल्याने त्यांचे आरोपपत्रातून नाव हटवण्यात आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aryan khan admitted consuming ganja during his graduation days in us 2018 in mumbai cruise drugs case to ncb dcp

First published on: 29-05-2022 at 14:57 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×