५६ वर्षांच्या प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा केले लग्न, फोटो व्हायरल

प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.

prakash raj, prakash raj marriage, pony verma,
प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूडचे जयकांत शिक्रे अर्थात प्रकाश राज त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. आजवर त्यांनी तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी या विविध भाषांमधील चित्रपटांत काम केले आहे. प्रकाश राज हे त्यांच्या मतांसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहतात. प्रकाश राज यांनी ११ वर्षांपूर्वी पोनी वर्माशी लग्न गाठ बांधली होती. पोनी वर्मा ही प्रकाश राज यांच्या पेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. त्यांच्या लग्नाला काल ११ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांनी एका अनोख्या अंदाजात हा दिवस साजरा केला आहे.

प्रकाश राज यांनी पत्नी पोनी वर्माशी दुसऱ्यांदा लग्न केले आहे. या लग्नाचे कारण त्यांचा मुलगा आहे. या विषयी त्यांनी सोशल मीडिया पोस्टवर सांगितले आहे. प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्रकाश त्यांची पत्नी पोनी वर्मा आणि मुलगा दिसत आहे. यात त्या दोघांनी पुन्हा एकदा लग्न केल्याचे दिसत आहे. एका फोटोत प्रकाश त्यांच्या पत्नीला प्रपोज करत आहेत. तर दुसऱ्या फोटोत ते किस करताना दिसत आहे. त्यानंतर एका फोटोत ते संपूर्ण कुटुंबासोबत दिसत आहेत. हे फोटो शेअर करत ‘आम्ही आज रात्री पुन्हा एकदा लग्न केले आहे…कारण आमचा मुलगा वेदांतला आमचं लग्न पाहायचं होतं,’ असे कॅप्शन प्रकाश यांनी दिले आहे.

आणखी वाचा : सलमानला विमानतळावर थांबवणाऱ्या CISF जवानावर कारवाई; मोबाइल जप्त

आणखी वाचा : मनोज वाजपेयीने केआरके विरोधात केला मानहानिचा दावा

प्रकाश राज यांनी २०१० मध्ये पत्नी पोनीशी लग्न केले. प्रकाश आणि पोनी एका चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. या सेटवर पोनी एका गाण्याची कोरिओग्राफी करत होती. प्रकाश आणि त्यांची पहिली पत्नी ललिता कुमारी २००९ मध्ये विभक्त झाले. दरम्यान, प्रकाश राज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘नवरसा’ या सीरिजमध्ये दिसले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Prakash raj gets married once again at 56 shares photos on social media dcp