scorecardresearch

“एका सच्च्या माणसाची भूमिका केल्याचं…” प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

प्रसाद ओकची ‘धर्मवीर’ चित्रपटातील भूमिका प्रचंड गाजली.

“एका सच्च्या माणसाची भूमिका केल्याचं…” प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत
प्रसाद ओकने शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आहे.

अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही महिने उलटले असले तरी चित्रपटाची चर्चा मात्र सोशल मीडियावर सातत्याने सुरू आहे. प्रसाद ओकची ‘धर्मवीर’ चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती आणि ही भूमिका प्रचंड गाजली. मागच्या काही दिवसांपासून चित्रपटाला एका मागोमाग एक पुरस्कार मिळताना दिसत आहेत. अशात आता प्रसाद ओकची नवी इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

प्रसाद ओकने नुकतीच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने त्याच्या ‘धर्मवीर’ चित्रपटातील भूमिकेसाठी आणखी एक पुरस्कार मिळाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. पुरस्कार स्वीकारतानाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना प्रसाद ओकने लिहिलं, “‘धर्मवीर’चा तिसरा पुरस्कार… ‘माझा पुरस्कार’… एका सच्च्या माणसाची भूमिका केल्याचं कौतुक एका सच्च्या माणसाकडून…!!! धन्यवाद मुळये काका… धन्यवाद टीम धर्मवीर…”

आणखी वाचा- ‘मोरूची मावशी’ नाटक अन् ब्लॅकची तिकिटं, विजय पाटकर यांनी सांगितला होता प्रदीप पटवर्धन यांचा किस्सा

प्रसाद ओकने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून या पोस्टवर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. आदिनाथ कोठारे, ऋतुजा बागवे, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, अभिजित खांडकेकर, अमृता खानविकर यांनी प्रसाद ओकच्या या पोस्टवर कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं आहे. याशिवाय त्याच्या चाहत्यांनीही या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा- ‘फक्त मराठी सिने सन्मान २०२२’ मध्ये ‘धर्मवीर’ चित्रपटाला तब्बल ७ पुरस्कार!

दरम्यान दरम्यान ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलं आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या