‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्राजक्ताचं फॅन फॉलोइंगसुद्धा मोठं आहे. रोजच्या जीवनातील विविध घडामोडी प्राजक्ता चाहत्यांसोबत शेअर करत असते.

उत्तम अभिनयशैली आणि गोजिरवाणा चेहरा यांच्या जोरावर प्राजक्ता आज विशेष लोकप्रिय आहे. तिच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. प्राजक्ताही चाहत्यांशी अनेक नवनवीन गोष्टी शेअर करत असते. आपल्या कामाच्या जोरावर मनोरंजन सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी प्राजक्ता वैयक्तिक आयुष्यातही चांगलीच प्रगती करत आहे. आता प्राजक्ताने नुकतंच एक नवीन घर घेतलं आहे. ही बातमी तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

आणखी वाचा : स्वप्निल जोशी ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या एका भागासाठी आकारतो ‘इतके’ मानधन, किंमत ऐकून व्हाल थक्क

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ तिच्या नवीन घराच्या गृहप्रवेश आणि सत्यनारायणाच्या पूजेचा आहे. नुकताच तिने नवीन घरात गृहप्रवेश आणि सत्यनारायणाची पूजा केली. या व्हिडीओत प्राजक्ता स्वतः पूजा करताना दिसतेय. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिलं, “नवीन घर… गृहप्रवेश… सत्यनारायण पूजा.”

हेही वाचा : मराठमोळ्या प्राजक्ता गायकवाडचं नथ कलेक्शन पाहिलेत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मनोरंजन सृष्टीतील तिच्या मित्रमंडळींनी त्याचप्रमाणे तिच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.