अभिनेते प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. प्रशांत दामले यांनी त्यांच्या विनोदीबुद्धीने प्रेक्षकांची मन जिंकली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच ते खवय्यांसाठीचे असलेले खास कार्यक्रम नेहमीच रंगवताना दिसतात.प्रशांत दामले हे काही दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबासोबत छान एन्जॉय करताना दिसले होते. त्यानंतर आता त्यांनी एक पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा कामाचा श्रीगणेशा करत असल्याचे सांगितले आहे.
प्रशांत दामले हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. ते छोट्या पडद्यासह अनेक नाटक करण्यावरही भर देत असतात. नुकतंच प्रशांत दामले यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी फार हटके कॅप्शनही दिले आहे.
‘नाटकाचे ‘प्रयोग’ का म्हणतात?’; चाहत्याच्या प्रश्नावर प्रशांत दामलेनं दिलं भन्नाट उत्तर
“चला आता हळू हळू कामाला लागूया नाहीतर अंगात आळस भरेल… सुट्टी संपत आली.. आपल्या आवडत्या कामाची आणि नाटकाची वेळ आली. कितीही वेळा बघा कुठूनही बघा आनंद तोच आजच तिकीट बुक करा. शिवाजी मंदिरला जवळ जवळ 3 वर्षांनी प्रयोग आहे आणि बोरिवलीला सुद्धा खुप महिन्यांनी. या आणि चार्ज व्हा..”, असे कॅप्शन प्रशांत दामले यांनी दिले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये प्रेक्षकांना हे नाटक बघण्याचे आवाहनदेखील केले आहे.
दरम्यान प्रशांत दामले हे त्यांच्या व्यस्त कामातून वेळ काढत कुटुंबासोबत फिरण्यासाठी गेले होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी याबाबतचे काही फोटो देखील शेअर केले होते. यात प्रशांत दामले यांची नातवंडे देखील पाहायला मिळत आहे. “सध्या सुट्टीवर आहे. जवळ जवळ ३ वर्षांनी आम्ही एकत्र भेटलो. एका लग्नाच्या अनेक गोष्टी असं झालंय आता.” असे त्यांनी हे फोटो पोस्ट करताना म्हटले होते.
“करोना आणि बंधन कधी संपतात असं झालंय…”, प्रशांत दामलेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकात मराठी रंगभूमीवरील प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही सदाबहार जोडी पाहायला मिळत आहे. या नाटकाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. त्यासोबतच ते झी मराठीवरील किचन कल्लाकार या शो मध्येही दिसले होते.