मराठीमध्ये प्रदर्शित होणारे उत्तम दर्जाचे चित्रपट प्रेक्षकांना भूरळ घालत आहेत. अशातच आता दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. रवी जाधव यांचा ‘टाइमपास ३’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आता ‘टाइमपास ३’च्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. या चित्रपटामधील एक धमाकेदार गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

आणखी वाचा – Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील बिनधास्त मुलगी वनिता खरातचे आजवरचे सर्वात बोल्ड लूक

‘टाइमपास ३’मधील ‘साई तुझं लेकरू’ गाणं सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आलं आहे. दगडू साईबाबांचा किती मोठा भक्त आहे हे यापूर्वीच आपण दोन भागांमध्ये पाहिलं. या गाण्यामध्ये देखील दगडूचे कुटुंब आणि मित्र साईंच्या चरणी प्रार्थना करताना दिसत आहेत. तसेच या गाण्यामध्ये भालचंद्र कदम म्हणजे भाऊ कदम याची झलक देखील पाहायला मिळत आहे.

जवळपास ४ मिनिटांचं हे गाणं तासाभरातच ४ हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. दगडू म्हणजे प्रथमेश परब याने या गाण्यामध्ये उत्तम नृत्य केलं आहे. त्याचबरोबरीने आरती वडगबाळकर, मनमीत पेम, ओंकार राऊत आणि जयेश चव्हाण या कलाकारांची झलकही या गाण्यामध्ये पाहायला मिळते. अमितराज आणि आदर्श शिंदे यांचा आवाज या गाण्याला लाभला आहे. तर क्षितीज पटवर्धन यांनी हे गाणं लिहिलं आहे.

आणखी वाचा – “महिलांवर घाणेरड्या, अश्लिल कमेंट करण्यासाठी…”; उर्मिला मातोंडकर यांचा राग अनावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवी जाधव दिग्दर्शित या चित्रपटाचीच सध्या सगळीकडे जोरदार चर्चा रंगत आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री हृता दुर्गुळे ‘टाइमपास ३’मध्ये मुख्य भूमिकेत काम करताना दिसेल. ‘टाइमपास ३’ची कथा ही दगडू-प्राजुच्या लग्नाआधीची आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती असलेला ‘टाइमपास ३’ २९ जुलैला चित्रपटगृहामध्ये दाखल होईल.