scorecardresearch

“परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट”, ‘सरसेनापती हंबीरराव’चा अंगावर काटा आणणार ट्रेलर प्रदर्शित

प्रवीण तरडेंच्या पत्नीनेही यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

Sarsenapati Hambirrao, pravin tarde,
प्रवीण तरडेंच्या पत्नीनेही यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे हंबीरराव मोहिते यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे हे हंबीरराव मोहिते यांच्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नुकतंच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘सह्याद्राचा कडा श्वास रोखून खडा’ प्रवीण तरडेंच्या या डायलॉगने ट्रेलरची सुरुवात होते. ‘परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट’ असे प्रवीण तरडेंचे अनेक दमदार डायलॉग ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. संभाजीना समजून घेण्या करिता तुम्हाला तुमचं काळीज शिवाजी महाराजांचं करावं लागलं, कारण संभाजी एकदाच माफ करतो पुन्हा गुन्हागार साफ करतो म्हणत गश्मीर महाजनीची ट्रेलरमध्ये धडकेबाज एंट्री होते. ट्रेलर बघून सिनेमाबाबत रसिकांची उत्सुकता वाढली आहे.

आणखी वाचा : “हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची…”, ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे आणि राज ठाकरेंच्या भेटीचा ‘तो’ सीन व्हायरल

आणखी वाचा : बाळासाहेबांचा मुलगा CM, ‘शिष्य’ शिंदे मंत्री, मुलगा खासदार पण आनंद दिघेंच्या…; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत

हा मराठीतला बिग बजेट चित्रपट असेल, असं प्रवीण तरडेंनी म्हटलं होतं. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्सची झलक पहायला मिळते. प्रवीण तरडेंच्या पत्नीनेही यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ट्रेलरमधील दमदार संवादही विशेष लक्ष वेधून घेतात. गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक करत आहेत. लॉकडाउनमुळे चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बरेच अडथळे आले होते. त्यामुळे प्रदर्शनालाही विलंब झाला. मात्र अखेर हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट २७ मे रोजी प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pravin tarde sarsenapati hambirrao trailer released dcp

ताज्या बातम्या