कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. भारती सिंहने काही महिन्यांपूर्वी ती आई होणार असल्याची गुडन्यूज दिली. भारती सिंह येत्या एप्रिल महिन्यामध्ये बाळाला जन्म देणार आहे. भारती ही गरोदर असतानाही पती हर्षसोबत ‘हुनरबाज: देश की शान’ हा रिअॅलिटी शो होस्ट करत आहे. ती नेहमी सेटवरील मजा मस्ती करतानाचे, गंमत करतानाचे व्हिडीओ पोस्ट करत असते. मात्र नुकतंच भारती सिंहला सेटवर मस्ती करणे महागात पडले आहे.

भारती सिंह हिचा मस्तीखोर स्वभाव सर्वांनाचा माहिती आहे. मात्र यामुळे हुनरबाजच्या सेटवर भारती सिंह ही पडता पडता बचावली आहे. यामुळे हर्षने तिला ओरडायला सुरुवात केली. याचा एक व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता.

या व्हिडीओमध्ये हर्ष भारतीला ओरडत असल्याचे दिसत आहे. यात भारती म्हणते की, ‘हर्ष मला यासाठी ओरडत आहे की मी सेटवर काम करत असताना पडणार होती. पण सुदैवाने मी बचावली.’ यावर हर्ष म्हणतो की, ‘मार खाशील. यानंतर पुन्हा कधी तू असं केलेलं मला चालणार नाही. अजिबात नाही. येथे शांत बसायचे.’ हर्ष तिच्या काळजीसाठी तिला ओरडत असल्याने ती त्याला गालावर किस करते.

दरम्यान ‘हुनरबाज: देश की शान’च्या पहिल्या एपिसोडमध्ये भारतीने गर्भवती महिलांबद्दल भाष्य केले होते. यावेळी तिने तिला गर्भवती नोकरदार महिलेबद्दल लोकांची असलेली विचारसरणी बदलायची असल्याचे सांगितले होते. मी तुम्हा सर्वांची आणि भारतातील सर्व मातांची विचारसरणी बदलेन. मी भारताची पहिली गर्भवती अँकर बनणार आहे, असे तिने सांगितले होते.

“मला शूटिंगच्या पहिल्याच दिवशी गर्भनिरोधक गोळी…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने केला खुलासा

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया लवकरच आई-वडील होणार आहेत. कॉमेडियन भारती सिंगने काही महिन्यांपूर्वी आपल्या युट्युब चॅनलद्वारे एका वेगळ्या अंदाजात ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. भारती सिंह एप्रिलमध्ये मुलाला जन्म देणार आहे.