यंदाच्या ‘घंटा पुरस्कार २०१६’ च्या विजेत्यांची नावे नुकतीच घोषित करण्यात आली. यात बॉलीवूडचा दबंग स्टार सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाने सर्वात वाईट चित्रपट म्हणून पुरस्कार पटकावलायं. तर शाहरुखला सर्वात वाईट अभिनेता म्हणून घोषित करण्यात आलेयं. बॉलीवूडमध्ये वर्षभरात वाईट कामगिरी करणा-यांना घंटा पुरस्कार दिला जातो.
बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई करणा-या सूरज बरजात्याच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटासाठी सोनम कपूरला वाईट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला. तर याचं चित्रपटाच्या शीर्षक गीताला वाईट गाण्याचा पुरस्कार मिळाला. यात सलमानच्या भावाची भूमिका करणा-या नील नितीन मुकेशला वाईट सहकलाकाराचा पुरस्कार मिळाला.
बॉलीवूड बादशाहा शाहरुखला ‘दिलवाले’ चित्रपटासाठी वाईट अभिनेता म्हणून पुरस्कार देण्यात आलायं. तर दिग्दर्शक विकास बहलला ‘शानदार’ चित्रपटासाठी वाईट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. ‘हिरो’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये वाईट पदार्पण करणारा अभिनेता म्हणून सूरज पंचोलीचे नाव आहे. तर बिपाशा बसूला ‘अलोन’ चित्रपटातील दुहेरी भूमिकेसाठी वाईट जोडीचा पुरस्कार मिळाला.
संग्रहित लेख, दिनांक 17th May 2016 रोजी प्रकाशित
प्रेम रतन धन पायो आणि शाहरुखला ‘घंटा पुरस्कार’
'घंटा पुरस्कार २०१६' च्या विजेत्यांची नावे नुकतीच घोषित करण्यात आली.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 17-05-2016 at 10:54 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prem ratan dhan payo shah rukh khan win ghanta awards