‘तारक मेहता…’मधील ‘या’ अभिनेत्रीने दुसऱ्यांदा केले लग्न!

अभिनेत्रीने १० वर्षांआधी पहिलं लग्न केलं असून तिला २ वर्षांचा मुलगा आहे.

priya ahuja, malav rajda,
अभिनेत्रीने १० वर्षांआधी लग्न केलं असून तिला २ वर्षांचा मुलगा आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजा पुन्हा एकगदा लग्न केले आहे.

प्रियाने दिग्दर्शक पती मालवा राजदा यांच्यासोबत पुन्हा एकदा लग्न केले आहे. १९ नोव्हेंबर रोजी प्रिया आणि मालव राजदा यांच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने ते पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकले आहेत. याचे फोटो प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्रियाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हे फोटो शेअर करत ‘परिंची कहाणी खरी झाली’, असे कॅप्शन प्रियाने दिले आहे.

आणखी वाचा : राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्रा ‘या’ गोष्टीवर करतोय १०० कोटी खर्च?

आणखी वाचा : बिग बींची पान मसाला कंपनीला कायदेशीर नोटिस; जाणून घ्या कारण…

प्रिया आणि मालवाला २ वर्षांचा मुलगा आहे. आई-वडिलांचे लग्न होताना पाहून तो फार आनंदी होता. दरम्यान, लग्नाच्या ८ वर्षांनंतप म्हणजेच २७ नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रियाने तिच्या मुलाला जन्म दिला. त्यांच्या लग्नात तारक मेहता…च्या टीमने हजेरी लावली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Priya ahuja get married for the second time with director malav rajda dcp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या