scorecardresearch

राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्रा ‘या’ गोष्टीवर करतोय १०० कोटी खर्च?

राणी मुखर्जीचा ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

rani mukerji, aditya chopra,
राणी मुखर्जीचा 'बंटी और बबली २' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

प्रॉडक्शन पॉवर हाऊस यशराज फिल्म्सचे प्रमुख आदित्य चोप्रा त्यांच्या पहिल्या ओटीटी प्रकल्पासाठी, ४ अभिनेते असलेल्या चित्रपटासाठी १०० कोटी रुपये खर्च करणार आहेत. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘यशराजला त्यांच्या प्रोजेक्टसाठी १०० कोटी खर्च करून त्यांच्या डिजिटल प्रोजेक्टमध्ये चांगला कंटेंट तयार करायचा आहे.’

सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, यशराज त्यांच्या ओटीटीवर धमाकेदार सुरुवात करायची आहे. यशराज यांना त्यांचा हा प्रोजेक्ट एवढा चांगला करायचा आहे की संपूर्ण देशात त्याची चर्चा असेल. १२ नोव्हेंबर रोजी अशी घोषणा करण्यात आली की चित्रपट निर्माते आदित्य चोप्रा यांचा ओटीटी प्रोजेक्ट एक वेगळीच सुरुवात करणार आहे.

आता डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपटांची आणि सीरिजची मोठी मागणी आहे. त्यामुळे यश राज फिल्म यात गुंतवणूक करत असल्याचं बोललं जात आहे. यशराज यांचा ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट तिचा पती आदित्य चोप्राने प्रोड्युस केला आहे. त्यामुळे राणी मुखर्जीच्या मर्दानी चित्रपटानंतर आदित्यने हा चित्रपट प्रोड्युस केला आहे. आदित्य आणि राणी एकत्र चित्रपटासाठी काम करताना दिसत आहेत. राणीच्या चित्रपटासाठी आदित्य कोटींची इन्वेस्टमेंट करताना दिसतो.

आणखी वाचा : लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायिकेने केली चाहत्याच्या चेहऱ्यावर ‘लघुशंका’

दरम्यान, ‘बंटी और बबली २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. ‘बंटी और बबली’ हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. आता १६ वर्षांनंतर त्याचा दुसरा पार्ट आला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-11-2021 at 10:06 IST

संबंधित बातम्या