हिंदीसह मराठी सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री म्हणून अभिनेत्री प्रिया मराठेला ओळखले जाते. प्रियाने आतापर्यंत अनेक खलनायकी व्यक्तिररेखांची साकारल्या आहेत. त्याची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. सध्या ती ‘तुझेच मी गात आहे’ या मालिकेत खलनायक भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे. फार कमी वेळेत ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील एका दृश्यात प्रिया मराठे अभिजीत खांडकेकरच्या अंगावर पाणी टाकताना दिसत आहे. नुकतंच प्रियाने या कलाकारांच्या शूटींगचा पडद्यामागचा व्हिडीओ शेअर केला आहे.

प्रियाने इन्स्टाग्रामवर नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रिया ही कॅमेऱ्यासमोर पाण्याचा ग्लास घेऊन येताना दिसत आहे. त्यानंतर ती तो ग्लास घेऊन अभिजीतच्या अंगावर टाकते. ती हा सीन छान एन्जॉय करताना दिसत आहे. प्रियाचा हा व्हिडीओ पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

“मी लायक आहे की नाही…”, अभिनेता गौरव मोरेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

प्रियाचा BTS व्हिडीओ हा सध्या चांगला व्हायरल होत आहे. ‘सीनसाठी अँक्टरना काय काय करावं लागतं आणि हे करताना मला अजिबात मज्जा आली नाही हे तर दिसतचं असेल’, अभिजीत मी तर तुझी मदत करत होते, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत.

“हातात मशाल अन् डोळ्यात आक्रमकता…”, अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रिया मराठे ही ‘तुझेच मी गात आहे’ मालिकेत अभिजित खांडकेकर म्हणजे मल्हार कामतच्या बायकोची भूमिका साकारत आहे. यात प्रियाचे पात्र थोडं निगेटिव्ह आहे. मात्र तरी तिला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून सांगितली जाणार आहे. अभिनेत्री उर्मिला कानिटकर-कोठारे तब्बल १२ वर्षांनंतर या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहे.