‘द फॅमिली मॅन’ फेम दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणीने मुस्तफा राजशी प्रेमविवाह केला आहे. प्रियामणी व मुस्तफाची प्रेम कहाणी खूपच मनोरंजक आहे. दोघांसाठी आंतरधर्मीय लग्न करणं अजिबात सोपं नव्हतं. प्रियामणीचे पूर्ण नाव प्रिया वासुदेव मणी अय्यर असून ती एक तमिळ ब्राह्मण आहे. तिने प्रेमाखातर धर्माची भिंत ओलांडली. तिने मुस्लीम असलेल्या मुस्तफा राजशी लग्न केले. मात्र, दोघांच्या लग्नात बराच गोंधळ झाला होता.

“माझं करिअर बरबाद झालं”, विक्रम भट्टबरोबरच्या अफेअरबद्दल अमीषा पटेलने सोडलं मौन; म्हणाली, “१३ वर्षे मी…”

मुस्तफा राजचे आधीच लग्न झाले होते आणि त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव आयशा आहे. ते दोघे २०१३ मध्ये वेगळे झाले. त्यानंतरच प्रियामणीने २०१७ मध्ये मुस्तफा राजशी लग्न केले. त्यांच्या लग्नानंतर मुस्तफाची पहिली पत्नी आयशाने आपला घटस्फोट झाला नसल्याचा दावा केला. तसेच प्रियामणी आणि मुस्तफा राज यांचे लग्न वैध नसल्याचं ती म्हणाली होती. पण, मुस्तफाने आयशाचे हे दावे फेटाळून लावले आणि ती पैशांसाठी खोटे दावे करत असल्याचं म्हटलं होतं. प्रियाचा पती मुस्तफाने काही एका मुलाखतीत याबद्दल माहिती दिली होती. मुस्तफाला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत, मुस्तफा मुलांच्या शिक्षणासाठी आयशाला पैसे देतो.

अदिती राव हैदरीने सिद्धार्थबरोबरच्या अफेअरबाबत सोडलं मौन; म्हणाली, “मला वाटतं की प्रत्येक…”

अभिनेत्री प्रियामणी आणि मुस्तफा राज यांची पहिली भेट बंगळुरूमध्ये आयपीएलच्या सामन्यादरम्यान झाली होती. या स्पर्धेतील एका क्रिकेट संघाची ब्रँड अॅम्बेसेडर असल्याने प्रियामणी तिच्या तिथे गेली होती. दुसरीकडे मुस्तफा राज इव्हेंट मॅनेजर होता. तिथेच एका अधिकृत मीटिंगमध्ये त्यांची पहिली भेट झाली होती. कामाव्यतिरिक्त प्रियामणी आणि मुस्तफा यांची केरळमध्ये पहिली भेट झाली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे एकमेकांच्या संपर्कात होते आणि हळूहळू चांगले मित्र झाले. प्रियामणी आणि मुस्तफा यांची चार वर्षांची मैत्री होती. दोघांची जवळीक वाढत होती आणि त्याबद्दल चर्चाही होऊ लागली होती. आयपीएल सामन्यांमध्ये ते बऱ्याचदा एकत्र दिसायचे. अशातच मुस्तफाने प्रियामणीला एका डान्स रिअॅलिटी शोच्या ग्रँड फिनाले एपिसोडमध्ये प्रपोज केलं होतं. त्यानंतर २०१६मध्ये त्यांची एंगेजमेंट झाली आणि २३ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांनी बंगळुरूमध्ये लग्न केलं.

पतीच्या पाठिंब्यामुळे संसार आणि करिअर सांभाळणं शक्य होत असल्याचं प्रियामणी अनेकदा मुलाखतींमध्ये सांगत असते. आपल्या करिअरमध्ये पतीचा मोलाचा वाटा असल्याचंही प्रियामणी म्हणते.