प्रियांका चोप्राच्या ‘मॅट्रिक्स ४’ चा ट्रेलर या दिवशी होणार प्रदर्शित!

प्रियांकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे.

priyanka chopra, matrix 4,
प्रियांकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये ही स्वत: ची एक जागा बनवली आहे. प्रियांका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्रियांका लवकरच ‘मॅट्रिक्स ४’ या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची प्रतिक्षा चाहते बऱ्याच काळापासून करत आहेत. एवढ्यात प्रियांकाने ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहिर केली आहे.

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ट्रेलर प्रदर्शनाची तारीख शेअर केली आहे. गोळी घेण्याची योग्य वेळ आली आहे. तिने चाहत्यांना लाल किंवा निळी या दोघांपैकी कोणतीही एक गोळी निवडायला सांगितली आहे. अमेरिकेच्या वेळेनुसार चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी सकाळी ६ वाजता प्रदर्शित होणार आहे. तर ही पोस्ट शेअर करत ‘आता तुम्हाला निवडायचे आहे,’ अशा आशयाचे कॅप्शन प्रियांकाने दिले आहे.

आणखी वाचा : ‘याला म्हणतात संस्कार’, बिग बींची नात आराध्याचा डान्सनंतर भजन गातानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

आणखी वाचा : कठीण काळात शिल्पाने सकारात्मक राहण्यासाठी केली ‘ही’ गोष्ट

‘मॅट्रिक्स ४’ या सायन्स फिक्शन चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती लाना वाचोव्स्की यांनी केले आहे. या चित्रपटात कियानू रीव्ह्स, कॅरी-अॅन मॉस आणि जडा पिंकेट स्मिथ यांनी या चित्रपटातील आधीच्या भागात काम केले आहे. ‘मॅट्रिक्स ४’ मध्ये आता याह्या अब्दुल-मतीन दुसरा, जेसिका हेनविक, जोनाथन ग्रॉफ, नील पॅट्रिक हॅरिस, प्रियंका चोप्रा आणि क्रिस्टीना रिक्की यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Priyanka chopra and keanu reeves starrer matrix 4 trailer release date announce dcp

ताज्या बातम्या