बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका आज तिचा ३७वा वाढदिवस साजरा करत आहे. दरम्यान प्रियांकाचा बर्थ डे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहता तिला सरप्राइज दिल्याचे दिसत आहे.

प्रियांकाच्या फॅन क्लबने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी प्रियांकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडीओमध्ये प्रियांका कोणासोबत तरी संवाद साधताना दिसत आहे. अचानक काही जण तिच्या समोर केक घेऊन येतात आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसतात. प्रियांकासाठी हे सरप्राइज होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्नासाठी प्रियांकाने सलमान खानचा ‘भारत’ हा चित्रपट नाकारला होता. लग्नानंतर तिने शोनाली बोसच्या ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. याची शूटिंग नुकतीच संपली असून यामध्ये झायरा वसीम, रोहित सराफ आणि फरहान अख्तर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. प्रियांकाच्या या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.