बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी काही दिवसांपूर्वी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बाळाची सोशल मीडियावर चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. सरोगसीच्या मदतीने आई झाल्यानंतर प्रियांकावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. प्रियांका चोप्राच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण फार उत्सुक आहे. नुकतंच प्रियांकाने तिची मुलगी कशी आहे? याबद्दल भाष्य केले आहे. यावेळी तिने तिला तिच्या मुलीला कसे वाढवणार आहे? याबद्दल सांगितले आहे.

प्रियांका चोप्रा ही नुकतंच ‘लिली सिंग’ नावाच्या पुस्तकाच्या लाँचिंग सोहळ्यात सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या मुलीबद्दल उघडपणे सांगितले. यादरम्यान तिने तिच्या मुलीला कसे वाढवायचे आहे? याबद्दलही सांगितले. यावेळी ती म्हणाली, आम्ही आताच नवीन पालक बनलो आहोत आणि मी सातत्याने त्याच गोष्टींचा विचार करत असते.

“मी माझ्या मुलीवर कधीही माझ्या इच्छा, भीती आणि पालकत्व याबद्दल कधीही जबरदस्ती करणार नाही, असे मी ठरवले आहे. मला नेहमीच विश्वास असतो की मुलं तुमच्याद्वारे त्यांचा मार्ग शोधतात. याचा फायदा मलाही झाला आहे. माझे पालक कधीही एखाद्या गोष्टींवरुन टोकाचा निर्णय घेत नाही आणि ते तुम्हाा आयुष्य घडवण्यात खूप मदत करते, असेही प्रियांका चोप्रा म्हणाली.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला? समोर आले कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्रियांका चोप्रानं काही महिन्यांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आई झाल्याची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली. त्या दोघांनी ही पोस्ट करताना म्हटले की, ‘आम्ही सरोगसीच्याद्वारे बाळाचं स्वागत केलं आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे क्षण आमच्यासाठी अतिशय खास आहेत आणि आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे. कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे. आमच्या भावनांचा आदर कराल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद.’ पण या पोस्टमध्ये तिनं मुलगा की मुलगी हे स्पष्ट केलेलं नाही. त्यानंतर प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्राने तिला मुलगी झाल्याची माहिती दिली होती.