बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरचं मराठीत पदार्पण करत आहे. मात्र, मराठी चित्रपटसृष्टीत ती अभिनेत्री म्हणून नाही तर निर्माती म्हणून पाऊल टाकतेय.
प्रियांका ‘वेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. तिची निर्मिती संस्था असलेल्या  ‘पर्पल पेबल पिक्चर्स’च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होईल. नुकताच या चित्रपटाचा मुहुर्त झाला. प्रियांकाने स्वतः याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. गणपतीच्या फोटोसमोर क्लॅपबोर्ड आणि चित्रपटाची स्क्रिप्ट असे छायाचित्र तिने ट्विट केले आहे. तसेच तिने या चित्रपटासाठी संपूर्ण टीमला शुभेच्छाही दिल्या. ‘फरारी की सवारी’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर ‘वेंटिलेटर’चे दिग्दर्शन करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


प्रियांकाची निर्मिती कंपनी मराठीसोबतच पंजाबी आणि भोजपुरी चित्रपटांचीही निर्मिती करणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopras production house begins shooting first marathi film ventilator
First published on: 12-02-2016 at 14:13 IST