छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात असतो. मालिकांमधील प्रत्येक कलाकार घराघरांत लोकप्रिय होतात. सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू असणारी ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका रंजक वळणावर आहे. या मालिकेत अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. परंतु, सध्या या मालिकेत विश्वरुपची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या घरी आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यामागचं कारण म्हणजे त्याच्या घरी चिमुकलीचं आगमन झालेलं आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अजिंक्य दातेला खऱ्या आयुष्यात कन्यारत्न प्राप्ती झाल्याने त्याचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. त्याने मालिकेत विश्वरुपची भूमिका साकारली आहे. मालिकेचं शूटिंग सुरू असतानाच त्याला ही गोड बातमी मिळाली. यासंदर्भात पोस्ट शेअर करून त्याने आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा : नाट्यरंग : आज्जीबाई जोरात – नव्या पिढीचं आधुनिक बालनाट्य…
अजिंक्य दातेची पोस्ट
“अरे चलो भाई फटाफट लाईटिंग करो यार, विश्वरूपको निकलना है” असं म्हणत स्वतः त्यांच्या मागे लागत काम करून घेणारा आमचा लीड @raqeshbapat
मला लवकर निघता यावं म्हणून अख्ख्या सीनचं स्ट्रक्चर माझ्या सोयीने करणारी आमची डिरेक्शन टीम…@sunny_the_jugadu @chandrakant.gaikwad.9
निघताना सावकाश जा, फोन करत रहा असं ठणकावून सांगणारी माझी सहकलाकार मंडळी आणि प्रोडक्शन टीम
हे सगळे का झटपट करत होते…काय झालं होतं…असं कुठे जायचं होतं मला…तर, कारण होतं आमच्या कुटुंबात दाखल होणाऱ्या नव्या मेंबरच्या एन्ट्रीचं…
प्राचीला १ मे ला सकाळीच ६ वाजता चिंचवडच्या कामत हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं(तशी तिची तारीख १९/२० मे दिली होती) दिवसभरात काहीच घडलंच नाही… दुसर्या दिवशी २ मे ला मला शूटींगला जाणं भाग होतं कारण तिथेही एपिसोड अडकले होते… पुण्याहून ठाण्यात स्टुडिओत पोहचल्यावरही सगळं लक्ष फोनकडेच होतं…सीन होत होते…बाहेर गरमी आणि माझं टेन्शन टॉपवर होतं…
दुपारी साडेचार पाचच्या दरम्यान फोन आला आणि आमच्या मेव्हणीबाईंनी बायकोच्या लेबर पेनचा आवाज ऐकवला… उरलंसुरलं आवसान गळून गेलं… आणि मग घडला तो सुरुवातीला लिहिलेला तो प्रसंग… मग शूटींग संपवून गाडीने जो निघालो तोच वाटेत फोन आला की “अभिनंदन… बाप झालास… मुलगी झाली”बास….त्यानंतर मी गाडी चालवत पोचलो की हवेवर तरंगत मला नाही माहित…
इतकं भारावून जाणं या आधी कधीच घडलं नव्हतं…
फायनली जेव्हा पोहोचलो आणि पोरीला बघितलं तेव्हा एकच फिलिंग होतं “और यहा मे पिघल गया”
स्वतःला बेरड समजायचो… ‘आपन रडत नसतोय’ याचा उगाच माज करायचो पण तो खोटा आहे हेही कळालं.. इतकं क्युट काहीतरी घडतंय आणि तेही माझ्या आयुष्यात यावर खरंच विश्वास बसत नव्हता…आम्हाला मुलगी झाली पण तिने आई, बाबा, आजी आजोबा, मावशी, मामा, आत्या, काका अशी बक्कळ नाती जन्माला घातली…
आणि आणि आणि
आज ३ मे… आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस
इतका खास कधीच होऊ शकत नाही…
बायको… लयीच कम्माल गिफ्ट दिलंस… मोक्कार खुश आहे आपन… लव यु…@prachepacchghare
हेही वाचा : Video: जय श्री राम! प्रसाद ओकने कुटुंबासह अयोध्येतील रामलल्लाचं घेतलं दर्शन, पत्नीने व्हिडीओ केला शेअर
दरम्यान, अजिंक्यने शेअर केलेल्या या पोस्टवर सध्या नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. याशिवाय ऋतुजा कुलकर्णी, भूमिजा पाटील, गौरव मालणकर या कलाकारांनी सुद्धा खास कमेंट करत अजिंक्यला पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.